Devendra fadnavis & Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : वर्षा बंगल्यावर ५० लाख महिला धडकणार? नाशिकमधील मराठा समाजाच्या बैठकीत काय ठरलं..

Nashik Maratha Community Meeting for Mumbai Protest : मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. नाशिकमधून त्यांच्या आंदोलनाला मोठं बळ मिळणार आहे.

Ganesh Sonawane

Maratha Reservation Mumbai Protest : मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. जरांगे पाटील हे भगवे वादळ घेऊन 19 सप्टेंबर रोजी मुंबईत धडक देणार आहेत. मुंबईतील आझाद मैदान येथे त्यांचे उपोषण होणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा समाज एकवटला आहे. मुंबईतील मुख्य आंदोलन आझाद मैदानावर होणार असले, तरी नाशिकच्या बैठकीत वर्षा बंगल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. वर्षा बंगल्यावर ५० लाख महिला धडकतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यामुळे मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या मोठ्या सहभागाचे नियोजन करण्यावर बैठकीत चर्चा झाली.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आंदोलनाच्या तयारी संदर्भात बैठक झाली. जरांगे पाटील सांगतील तोच अंतिम आदेश मानून मुंबईकडे मोठ्या संख्येने कूच करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग असले असे बैठकीत ठरलं.

नाशिक जिल्ह्यातून तब्बल ६० ते ७० टक्के महिला मुंबईत आंदोलनासाठी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. वर्षा बंगल्यावर ५० लाख महिला धडकतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. मुंबईकडे रवाना होणाऱ्या महिलांना सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावं असे आवाहन करण्यात आलं आहे.

जरांगे पाटील यांच्या यापूर्वीच्या आंदोलनांना देखील नाशिकमधून मोठा प्रतिसाद मिळाला होता. नाशिकमध्ये एका गटाने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला नसला तरी दुसरा गट मात्र जरांगे पाटील यांच्या पाठिमागे भक्कमपणे उभा असल्याचे दिसत आहे. आता यावेळेला देखील आंदोलकांना अन्नाची व्यवस्था करण्याची जबाबदारी नाशिकने घेतली आहे.

नाशिक जिल्ह्यातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला भाजीपाला आणि मोठ्या प्रमाणात शेतमाल पुरविला जातो. त्यामुळे आंदोलनासाठी येणाऱ्या समाजबांधवांच्या अन्नदानाची व्यवस्था करण्यासाठी ‘एक भाकर समाजासाठी’ या भावनेतून शिदोरीची जबाबदारी नाशिक जिल्हा पार पाडेल, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.Maratha Reservation

आंदोलनाच्या काळात मराठा बांधवाची एकजूट कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवून जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार पुढील भूमिका घेण्याचे आवाहन उपस्थितांनी केले. बैठकीत सोनिया होळकर, भास्कर झाल्टे (नांदगाव), शिवा पाटील-सुरासे, मंगेश कदम (निळखेडे), अभिजित डुकरे, सुलक्षणा भोसले, भीमराज लोखंडे (मनमाड), केदार नवले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रवीण कदम, प्रसाद फापाळे, राकेश फापाळे, संदीप फापाळे, राजेश भडांगे, पंडित मुदगल, भारत काळे, अनिल जगताप, अनिल दरेकर, नितीन पगार, मंगेश कदम, दत्तात्रय दरेकर आदी उपस्थित होते.

जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सोमवारी १७ वा दिवस आहे. आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी उपचार, पाणी बंद केलं आहे. त्यानंतर जरांगे पाटील हे दुपारी १२ वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ते काय बोलणार याकडे मराठा बांधवाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT