Funeral of Gunvant Sadavarte Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : संतप्त आंदोलकांनी थेट सदावर्ते यांची अंत्ययात्राच काढली!

Maratha Community Protest : सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.

Sampat Devgire

Nashik Maratha News : मराठा आरक्षण तसेच या विषयावरील मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाबाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांना आव्हान दिले होते. मात्र, आव्हान दिल्यावर ते नाशिकला फिरकलेच नाहीत.(Maratha community warns government & Adv. Sadavarte on Reservation issue)

सकल मराठा समाजाच्या (Maratha) आरक्षणाच्या आंदोलनाबाबत ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांनी आंदोलकांना आव्हान दिले होते. त्यांच्या वादग्रस्त विधानांचा निषेध करीत संतप्त कार्यकर्त्यांनी (Nashik) चक्क सदावर्ते यांची अंत्ययात्रा काढील त्यांचा पुतळा जाळला.

युवकांच्या भावना दुखावण्याचे काम

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी चाळीस दिवसांचा कालावधी संपल्याने पुन्हा एकदा अंतरवाली सराटी (जालना) येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाबाबत ॲड. गुणरत्न सदावर्ते हे वारंवार मराठा आरक्षणाच्या विरुद्ध बोलतात. जरांगे पाटील यांना अटक करा, अशी विधाने करून समाजाच्या शांततापूर्ण आंदोलन व आंदोलकांना डिवचण्याचा प्रयत्न करतात. शांततापूर्ण समाजाची अवहेलना करतात, त्यामुळे याबाबत युवकांच्या भावना दुखावल्या आहेत.

मागच्या वेळी समाजाला मिळालेले आरक्षण केवळ अॅड. सदावर्ते यांच्यामुळेच रद्द झाले. सदावर्ते हे कोणाच्या आशीर्वादाने हे सर्व करीत आहे, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे राज्य शासनाने त्यात हस्तक्षेप करून समाजाला डिवचण्याचे काम वेळीच थांबवावे, असे आवाहन करण्यात आले.

ॲड. सदावर्ते यांच्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले, याबाबत युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अशी भावना तरुणांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवारी मातेरेवाडी (ता. दिंडोरी) येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे सदस्य, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी बैठक घेतली. सदावर्ते यांचा निषेध केला.

या वेळी एक मराठा लाख मराठा मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, जिल्हा संघटक किरण भोज, उपाध्यक्ष समाधान कतोरे, शाखाप्रमुख महेश शिंदे, महेश शेळके, विद्यार्थी प्रतिनिधी अभय सोनवणे, प्रतीक दुगजे, ओंकार दुगजे, विशाल जाधव आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT