Sangli Latest News : राज्यभरात मराठा समाज आक्रमक होत असताना सांगलीतील सत्ताधारी खासदार आणि आमदार मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक झाले आहेत. आज सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आणि खासदार एकदिवसीय उपोषण करणार आहेत. एकाच व्यासपीठावर सर्व आमदार आणि खासदार एकत्र येत असल्याने आज होणाऱ्या उपोषणात कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षण प्रश्नावरून आज सांगली जिल्ह्यातल्या आमदार-खासदारांना मराठा समाजाने चांगलेच धारेवर धरले आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाणी प्रश्नाच्या बैठकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते.
उपस्थित असणाऱ्या पालकमंत्री खासदार, आमदारांना गाठत मराठा समाजाने प्रश्नांचा भडीमार केला. अगदी राजीनामा देण्यापासून मराठा समाजाचे आमदार-खासदार आता काय भूमिका घेणार ? यावर आक्रमक पवित्रा घेतला. सर्वांनी आताच भूमिका जाहीर करावी, अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली.
यावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांकडून मुख्यमंत्र्यांना एकदिवसीय अधिवेशन घेण्याबाबत पत्र देण्याबरोबरच मराठा आरक्षण मागणीसाठी एकदिवसीय उपोषण करण्याचे जाहीर करण्यात आले. सोमवारी (आज) शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सांगली जिल्ह्यातले सर्वपक्षीय आमदार खासदार हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.
या बैठकीला पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, विशाल पाटील उपस्थित होते.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.