Sanjay Raut News : ''भीमा-कोरेगावप्रमाणे दंगली उसळाव्यात यासाठी सरकार...'' ; संजय राऊतांचं मोठं विधान!

Sanjay Raut's Allegations : पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेलाही दिलं आहे प्रत्युत्तर, जाणून घ्या काय म्हणाले?
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे -

Sanjay Raut and Maratha Reservation : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपात्रतेच्या सुनावणी आणि मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. 'राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. कायदा-सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडावी आणि भीमा-कोरेगावप्रमाणे दंगली उसळाव्यात, यासाठी सरकार पेटवा-पेटवी करत असल्याची शंका येत आहे', असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Thackeray Vs Shinde: ठाकरे गटाची मोठी खेळी; श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उघडली नवी शाखा

खासदार संजय राऊत आज नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुका येथे आले होते. साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. संजय राऊत यांनी आमदार अपात्रतेची सुनावणी, मराठा आरक्षण, राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणावरून पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले, ''देशातील सर्वोच्च न्यायालयाला जुमानत नाहीत. मस्तवाल धोरण राबवले जात आहे. हम करो सो, कायदा, असे वागत आहे. घटनेतील कायदा मानत नाही, असा कारभार सुरू आहे.''

खासदार राऊत म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत सरकार हतबल आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडावी आणि भीमा-कोरेगावप्रमाणे दंगली उसळाव्यात यासाठी सरकार पेटवा-पेटवी करत असल्याची शंका येत आहे".

याचबरोबर ''आमदार अपात्रतेच्या कारवाईवर बोलताना, हे सरकार घटनाबाह्य आहे. बेकायदेशीर खुर्चीवर बसले आहे. पूर्वीच्या काळात मुंबईत अंडरवर्ल्डचे लोक एखाद्या जागेत बेकायदेशीर घुसायचे आणि मालक म्हणून सांगायचे. तसे या सरकारचे झाले आहे. विधानसभेत, मंत्रालयात, सरकारच्या खुर्चीवर घुसले आहे. मात्र, पुढे गुंडाचा एन्काउंटर होत असतो'', असे राऊत यांनी सांगितले.

मनोज जरांगेंना दिल्लीला न्यावे -

मराठा आरक्षणावर केंद्रालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे, असे सांगून मनोज जरांगे पाटील यांना आहे, त्याच परिस्थितीत हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला घेऊन जावे. पंतप्रधान यांच्यासमोर त्यांची बैठक होणे गरजेचे आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवत आहे. त्यांना बोलता येत नाही. हात थरथरत आहेत. जोपर्यंत बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेला या अशी आर्त हाक ते घालत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Maratha Reservation : रोहितदादांनी संघर्ष यात्रा थांबवली, अजितदादांनी गाळपाला जाणे टाळले; आता शरद पवार त्याला जाणार का?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना दिल्लीत राजकीय कामासाठी भेटत असतात. स्वतःसाठी तोडगा घेऊन येतात, मग मराठा आरक्षणावर तोडगा का काढत नाहीत, असाही प्रश्न खासदार राऊत यांनी उपस्थित केला.

सत्तर वर्षांत सर्व मोदींनीच केले-

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गेली ५० वर्षे काय केले, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत पंतप्रधानांवर टीका केली. 'सत्तर वर्षांत जे काही केले मोदींनीच केले. दुसरे कोणी जन्माला आलेच नाही ना! तेच आलेत फक्त! मोदींनीच केले सर्व'! असं त्यांनी म्हटलं.

Sanjay Raut
Eknath Shinde : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; नोंदी असलेल्यांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र द्या!

खासदार पाटलांनी ढोंग करू नये -

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारने दबाव आणणे गरजेचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 'हे मला माहीत नाही. ढोंग करू नये', असा एका वाक्यात खासदार संजय राऊत यांनी हा विषय संपवला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com