Chhagan Bhujbal,Supriya Sule  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा मोठा दावा; मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक आमदार...

Supriya Sule : मला एकट्याला लढायची सवय आहे. संघर्ष मला नवीन नाही...

संपत देवगिरे ः सरकारनामा

Chhagan Bhujbal On Supriya Sule : मराठा आरक्षणाप्रश्नी मंत्री छगन भुजबळ यांना एकटे पाडले जात आहे. त्यांना मंत्रीमंडळात बोलू दिले जात नाही. त्यांना बाहेर व्यासपीठावर बोलावे लागते, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. सुळे यांच्या या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी एकटा नाही, असे म्हणत भुजबळ यांनी सूचक इशारा दिला आहे.

मला एकट्याला लढायची सवय आहे. संघर्ष मला नवीन नाही. त्याच पध्दतीने माझे काम सुरू आहे. मात्र मी एकटा नाही. माझ्या मागे असंख्य नागरिक आणि काही आमदार असल्याचे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राज्यातील काही आमदारही माझ्याबरोबर आहेत. मात्र, ते सध्या बोलत नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत २० जानेवारीला आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. त्याची तयारी देखील सुरू आहे. यावर सरकार काय भुमिका घेणार याविषयी चर्चा होत असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोलण्याचे टाळले. सरकारकडून मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ओबीसून आरक्षण मिळावे या आपल्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगेंवर टिका टाळली

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांना छगन भुजबळ हे नेहमीच टार्गेट करत असतात. मात्र, पत्रकारांशी बोलताा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका करण्याचे टाळले. नुकतेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळ यांना संयम ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे भुजबळ हे जरांगे पाटील यांच्यावर बोलण्याचे टाळत नसतील ना, असे बोलले जात आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT