Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांकडून भाजपची कोंडी ?

Lok Sabha Seat Allocation : शिंदे गटाएवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळायला हव्यात...
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या मागणीने महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जागावाटपाबाबत केलेली मागणी भाजपच्या अडचणीत भर टाकणारी ठरण्याची शक्यता आहे.

महायुतीमध्ये (Mahayuti) सध्या तीन पक्ष आहेत. त्याचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे आहे. सध्या भाजपने (BJP) सर्व लक्ष लोकसभा निवडणुकांची तयारी आणि जागावाटपावर केंद्रीत केले आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात रोज प्रत्यक्ष ग्राऊंडवर तसेच ऑनलाईन संपर्क मोहीम राबविली जात आहे. यामध्ये अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही.

Chhagan Bhujbal
Kolhapur Politics : शिक्षक बँक निवडणूक; काँग्रेसचे आमदार आसगावकर अन् दादा लाड भिडणार, लक्षवेधी लढत!

शिवसेनेच्या शिंदे गटाचे जेवढे आमदार आले, तेवढेच आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रवादी’चेही आमदार महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे लोकसभा (Loksabha) आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच जागा ‘राष्ट्रवादी’च्या अजित पवार गटालाही मिळायला हव्यात, अशी मागणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे.

भाजपने राज्यात लोकसभेसाठी '45 प्लस'ची अशी घोषणा केली आहे. विरोधकांवर राजकीय दबाव निर्माण करण्याबरोबरच मतदारांत भाजपच्या क्षमतेचा संदेश देण्यासाठी हा प्रयत्न आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटात फूट पाडल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिंदे गटाचे 11 खासदार भाजपसोबत गेलेत. मात्र राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या 3 खासदारांपैकी केवळ एक खासदार भाजपसोबत गेलेला आहे. अशा स्थितीत जागावाटपाचे सूत्र काय ? याविषयी महायुतीच्या घटक पक्षांतही गोंधळ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागांवर उमेदवार देणार, असे कर्जतमधील पक्षाच्या अधिवेशनात जाहीर केले होते.

त्यानंतर लोकसभेच्या उमेदवारीच्या अपेक्षेने अजित पवार यांच्यासोबत गेलेले राज्यातील अन्य मतदारसंघातील काही इच्छूक नेते नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांनी जागावाटपाबाबत केलेला दावा, भाजपवर दबाव टाकण्यासाठी तर नाही, अशी चर्चा आहे.

(Edited by Amol Sutar)

Chhagan Bhujbal
Gopal Tiwari News : 'सांस्कृतिक कार्यक्रमाचा केला राजकीय आखाडा, अटलजींच्या सद्गुणांचा फडणवीसांना विसर'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com