Devendra Fadnavis,  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : फडणवीसांच्या आवाहनावर जरांगे पाटील थेट बोलले...; भुजबळांवर साधला निशाणा

Maratha Reservation Protest Devendra Fadnavis Appeal : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनावर मनोज जरांगे पाटीला यांनी प्रतिक्रिया दिली आहे...

राजेंद्र त्रिमुखे

Maratha Reservation in Maharashtra : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात आणि ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार वाकयुद्ध पेटलेले आहे. जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांना आंबड येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी खरमरीत शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले होते. अगदी वैयक्तिक पातळीवर टीका केली होती.

जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील पुन्हा बोलले आहेत. आपल्या मागण्या मांडताना आग्रही असले तरी त्यामुळे समाजात समाजात तेढ निर्माण होता कामा नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी जरांगे पाटील यांना केले आहे. श्रीरामपूरमध्ये जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील यांनी फडणवीसांच्या आवाहनाला अनुरून प्रतिक्रिया दिली. "आधी तुमच्या माणसाला जातीयवादी बोलणे थांबवा, तुमचा माणूस बोलायचा थांबला की आम्ही बघू (त्यावर विचार करू)", असे प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी फडवणीस यांना दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील सध्या तिसऱ्या टप्प्यात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या तिसऱ्या टप्प्याची सांगता आज नगर जिल्ह्यातील बोधेगाव येथे होणार आहे. तत्पूर्वी आज सकाळी श्रीरामपूर येथे माध्यमांशी जरांगे पाटील यांनी बातचीत केली. यावेळी तिसरा टप्पा संपत असल्याने लवकरच चौथ्या टप्प्याची माहिती पुढील दोन दिवसात जाहीर करण्यात येईल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील पुढील चौथा टप्पा हा विस्तृत असेल, असे सांगताना त्यांनी विदर्भ आणि मराठवाडा याबरोबरच राज्यात पंढरपूर, बीड आदी राहिलेल्या भागांमध्ये दौरा केला जाणार असल्याचे सांगितले. या दौऱ्याची सुरुवात खानदेशमधून होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी एक डिसेंबरला जालन्यामध्ये पूर्ण दिवसभर कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले.

समाजातील मागण्या आग्रहाने मांडल्या पाहिजेत. मात्र त्या मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल आकस निर्माण होईल, अशी भाषा नको अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जरांगे पाटलांकडून व्यक्त केली. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. जातीवादी भाषा कोण वापरतंय? तुमचाच माणूस वापरत आहे. तुमच्या माणसाला जातीयवादी बोलणे थांबवायला सांगा. त्यांचा माणूस बोलायचा थांबला की मग बघू, असे जरांगे पाटील म्हणाले.

आम्ही आता यापुढे मुदत वाढवून देणार नाही. 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेलेच असेल, असा ठाम विश्वासही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT