Devendra Fadnavis : मराठा आंदोलकांचा विरोध मावळला; कार्तिकी पूजेचा फडणवीसांचा मार्ग मोकळा

Pandharpur Kartiki Mahapuja : मराठा समाजाच्या सर्व पाचही मागण्या मान्य
Devendra Fadnavi in Vitthal Temple
Devendra Fadnavi in Vitthal TempleSarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : पंढरपुरातील मराठा समाजाच्या सर्व पाचही मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे कार्तिक एकादशीनिमित्त होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी होणारी कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत.

सकल मराठा समाजाच्या वतीने 8 सप्टेंबरपासून पंढरपुरातील तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत होते. आंदोलकांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला विरोध दर्शवला होता. आपल्या निर्णयावर आंदोलक 18 नोव्हेंबरपर्यंत ठाम होते.

Devendra Fadnavi in Vitthal Temple
Pasha Patel News : महायुती सरकारचं पाशा पटेलांना 'हे' मोठं गिफ्ट...

दरम्यान, या आंदोलकांमध्ये दोन गट पडले होते. एका गटाने शासकीय महापूजेला विरोध नाही, तर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध कायम असल्याचे सांगितले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आंदोलनकर्ते गणेश महाराज जाधव यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळही मराठा शिष्टमंडळाने वेळ मागितला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध नसल्याचे माजी उपनगराध्यक्ष तथा सकल मराठा समाजाचे नागेश भोसले यांनी सांगितले होते. मात्र, मराठा क्रांती मोर्चाने आपला विरोध कायम ठेवला होता. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाडांनी शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी येऊ नये; अन्यथा होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल, असा थेट इशारा दिला होता. आता हा विरोध मावळला असून, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा झाला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavi in Vitthal Temple
Shivsena Political News : उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; उसाच्या कांडीला हात लावू देणार नाही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com