Devendra Fadnavis News : " मराठा समाजाला आरक्षण दिले तर फडणवीसांना 10 किलो सोन्याचा हार घालणार..."

Maratha Reservation : शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात आलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीसांबाबत कोणी केलं हे विधान...
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्राचं राजकारण पेटलं आहे.याच आंदोलनाचे सावट पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेवर देखील होतं.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणाऱ्या या पूजेला देखील विरोध दर्शविला होता. पण मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या मान्य केल्याने फडणवीसांच्या पूजेचा मार्ग मोकळा झाला. फडणवीस हे महापूजेसाठी बुधवारी पंढरपुरात दाखल झाले आहे. याचवेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मोठं विधान केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी पंढरपूर येथे पार पडली. या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी फडणवीसांना शब्द दिला. ते म्हणाले, जर ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिले तर फडणवीसांना 10 किलो सोन्याचा हार घालणार आहे.उपमुख्यमंत्री यांच्या पंढरपूर दौर्याला आणि शासकीय महापूजेला गायकवाड यांनी विरोध विरोध केला होता.

Devendra Fadnavis News
Pankaja Munde : ''जवळचं कमी दिसत होतं वाटतं, ते आता...'' पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत!

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठोबाची पंढरी कार्तिकी सोहळ्यासाठी (Kartiki Ekadashi) सज्ज झाली आहे.या सोहळ्यासाठी राज्यभरातील सात लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.दरम्यान,बुधवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर येथे दाखल झाले आहे. तसेच,उद्या पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दौऱ्यात पंढरपूर विकासाच्या 2700 कोटीच्या प्रकल्पाबाबत आणि कॉरिडॉरबाबत काय घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहेत.तसेच, पंढरपूरमध्ये दाखल झाल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या शिष्ठमंडळाशी बुधवारी दुपारी चर्चा केली आहे. यासोबतच,धनगर समाज आणि आदिवासी कोळी समाजाच्या शिष्ठमंडळाकडून देखील फडणवीस यांची देखील भेट होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सकल मराठा समाजाच्या वतीने 8 सप्टेंबरपासून पंढरपुरातील तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत होते. आंदोलकांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला विरोध दर्शवला होता. आपल्या निर्णयावर आंदोलक 18 नोव्हेंबरपर्यंत ठाम होते.

दरम्यान, या आंदोलकांमध्ये दोन गट पडले होते. एका गटाने शासकीय महापूजेला विरोध नाही, तर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध कायम असल्याचे सांगितले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आंदोलनकर्ते गणेश महाराज जाधव यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळही मराठा शिष्टमंडळाने वेळ मागितला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Devendra Fadnavis News
Akola Police : अवैध धंद्यांवरुन एकाच वेळी सत्ताधारी, विरोधी पक्षातील आमदारांचा ‘लेटरबॉम्ब’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com