Chhagan Bhujbal & Chandrakant Bankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha reservation : भुजबळ साहेब, मराठा समाजाचे योगदान विसरू नका!

Sampat Devgire

Nashik Maratha & OBC Politics : छगन भुजबळ अनेक वर्षे मंत्री आहेत. नाशिकचे पालकमंत्री आहेत. या कालावधीत त्यांना मराठा समाजाने काय व किती मदत केली?. मराठा समाजाच्या आमदारांनी पाठिंबा दिला होता की नाही, याचे त्यांनी स्मरण करावे. (Maratha community still carry on there hunger strike in Nashik)

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे नाशिक शहरातील (Nashik) साखळी उपोषण अद्याप सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या टीकेला आंदोलकांनी उत्तर दिले आहे.

यासंदर्भाच उपोषणाला बसलेले माजी सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत बनकर यांनी मंत्री भुजबळ यांनी कुणबी जातीच्या पुराव्यांबाबत आक्षेप घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. ज्या नोंदी सापडत आहेत, त्या आजच्या नाहीत. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या आहेत. महसुली दप्तरातील आहेत. सत्यता, इतिहास आणि परंपरेला धरून आहेत. शासकीय यंत्रणेने त्या शोधल्या आहेत. त्यामुळे छगन भुजबळ ज्या सरकारचे प्रतिनिधित्व करतात, त्या सरकारच्या प्रशासनावर त्यांना विश्वास नाही का?, असा प्रश्न त्यांनी केला.

ते म्हणाले, आमच्या पूर्वजांच्या शंभर, दोनशे वर्षांपूर्वी कुणबीच्या नोंदी झालेल्या आहेत. कायदा व नियमाप्रमाणे त्या नोंदी काढून त्यांच्या वंशजांना कुणबी जातीचे दाखले देण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आपल्याच सरकारने देण्याचे ठरवले आहे, कुणबी आरक्षण हा आमचा कायदेशीर हक्क असताना, छगन भुजबळ साहेब आपला जळफळाट होण्याचे काहीच कारण नाही.

बनकर म्हणाले, मंडल आयोगाच्या वेळी कोणत्याही पुराव्याविना ओबीसी समाज घटकांना आरक्षण देण्यात आले. त्यावेळी मराठा समाजाने त्याला विरोध केला नाही. मोठ्या मनाने आपल्यालाही वेळोवेळी मराठा समाजाने मतदान केलेले आहे, हे आपण विसरलात की काय?.

बनकर यांनी भुजबळ यांच्या सध्याची भूमिका आणि विधाने याबाबत खेजद व्यक्त केला. सध्या काळ बदललेला आहे. शंभर एकर मालकीचे क्षेत्र असलेला मराठा समाज बांधव, अवघ्या एक गुंठ्यांवर आला आहे. अनेक लोक भूमिहीन झाले आहेत. काळानुसार या विस्थापित मराठा समाजाला त्यांच्या हक्काच्या आरक्षणची गरज आहे. आपण मराठा आरक्षणाला जो विरोध करीत आहात, त्याचा आम्ही सकल मराठा समाज्याच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT