Manoj Jarange Patil News : जरांगे पाटील १५ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; शाहू महाराजांना अभिवादन करून कोल्हापुरात सुरुवात

Maratha Reservation Manoj Jarange Patil Maharashtra Daura : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. यासोबत उपोषणाचं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे...
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Maratha Reservation In Maharashtra : मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दौरा करण्यात येणार आहे. वाशी, परांडा, करमाळा, दौंड, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, सातारा, मेंढा, वाई, रायगड, महाड दर्शन, मुळशी, आळंदी, तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याण, ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगावसह आणखी काही ठिकाणी दौरा करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचं जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा 'ॲक्टिव्ह मोड'वर; म्हणाले, माझी प्रकृती आता व्यवस्थित...

१ डिसेंबरपासून सर्वांनी प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करण्याची तयारी ठेवा. आम्ही केलेल्या दौऱ्यात १ एकही रुपया घेतला जात नाही. कोणीही पैसे मागितले तर देऊ नका. कारण या दौऱ्याचा खर्च सर्वजण स्वखर्चाने करत आहेत, असं जरांगे म्हणाले. मराठा समाजातील सामान्यांनी लढा सुरू केला आहे. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी हा लढा आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

२४ डिसेंबर ही तारीख जवळ येत आहे. सर्वांनी जागरूक राहायचं आहे. म्हणून हा दौरा सुरू केला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आणि घेऊनच राहू. आता आरक्षणाचे पत्र मिळू लागले आहेत. पत्र वाटप सुरू झाले आहे. आनंदीत व्हायला हवं आणि कोणीही आत्महत्या करू नका. २४ डिसेंबरसाठी सर्वांनी खांद्याला खांदा लावून एकजूट व्हा. मराठा समाजाला माझं हे शेवटचं आवाहन आहे. ही २४ तारीख म्हणजे मराठ्यांच्या जीवनातील एक प्रकाश आहे. घराघरांतील सर्वांनी एकत्रित व्हा. ५ ते ६ कोटी लोकांना एकजूट व्हायचं आहे. एकमेकांना फोन कर आणि सावध करा. आणि मराठा आरक्षणाची सर्वात मोठी एकी ही २४ डिसेंबरला राज्यात दिसली पाहिजे, असं जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange On OBC Reservation : ओबीसींना जास्तीचं मिळालेलं आरक्षण घटनाबाह्य; जरांगे पाटील कडाडले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com