Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha v/s Chhagan Bhujbal : `भुजबळसाहेब, आमच्या बांधावर येऊ नका`

Maratha Reservation issue, community followers opposed Chhagan Bhujbal-येवला मतदारसंघातील ४६ गावांच्या ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला दर्शवला विरोध. लवकरच पुढील भूमिका जाहीर करणार.

Sampat Devgire

Maharashtra Politics : ‘गावबंदी करायला महाराष्ट्राचा सात-बारा तुमच्या नावावर आहे काय?, असा प्रश्न केल्याचे स्मरण करून देत, भुजबळसाहेब तुम्ही उद्या ज्या बांधावर येत आहात, त्याचा सात-बारा नक्कीच आमच्या नावावर आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या बांधावर येऊ नका,’ असे आवाहन आज भुजबळ यांच्या मतदारसंघातील ४६ गावांच्या प्रतिनिधींनी केले. (fourty six village representitives appeal Chhagan Bhujbal not to visit there farms)

आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलनाला (Maratha Reservation) आव्हान देणाऱ्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आज त्यांच्या येवला (Nashik) मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला.

लासलगाव परिसरातील या ४६ गावांतील प्रतिनिधींची बैठक आज लासलगाव बाजार समितीच्या आवारात झाली. अन्न व नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी दौरा करणार असल्याचे पत्रक जाहीर झाल्यावर तातडीने ही बैठक घेण्यात आली. सोशल मीडियावरील आवाहनावरून ही बैठक झाली. त्याला मोठी गर्दी जमली होती. या बैठकीतील चर्चा व माहिती गोपनीय ठेवण्याची व त्यातील निर्णयावरील माहिती उद्या जाहीर करण्याचा निर्णय झाला.

सकल मराठा समाजाच्या आवाहनावरून ही बैठक झाली. त्यात लासलगाव-येवला परिसरातील ४६ गावांतील विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत बबन शिंदे, ललित दरेकर, डॉ. सुजित गुंजाळ, पिंटूभाऊ गायकर, प्रमोद पवार, अभिजित डुकरे, गोपीनाथ ठुबे, सचिन पवार, विक्रम शिंदे, पवन सफाळे, प्रसाद सफाळे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत आपल्या सूचना केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT