Beed Maratha Protest Case : बीड जाळपोळप्रकरणी अटकेतल्या टोळीप्रमुखावर राजकीय वरदहस्त? पोलिस अधीक्षक म्हणतात...

Beed Violence Case : कारवाईत पोलिसांवर दबाव निर्माण होत असल्याचीही चर्चा...
Beed Violence Case :
Beed Violence Case :Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात आणि एकूणच जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० ऑक्टोबर रोजी जाळपोळ अन् दगडफेकीचे प्रकार घडले होते. या प्रकरणी हिंसाचाराचा आरोप असलेला टोळीप्रमुख पप्पू शिंदे याला आता अटक करण्यात आली आहे. कोर्टात हजर केले असता, त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली गेली आहे. (Latest Marathi News)

Beed Violence Case :
Congress Vs BJP : काँग्रेस की भाजप..! राजस्थानमध्ये सत्तेचे काय आहे गणित ?

आरक्षण आंदोलनादरम्यानच पप्पू शिंदे यांनी एका व्यावसायिकाला धमकावण्याचा प्रकार केल्याचीही तक्रार पोलिसांकडे नोंद आहे, तर त्याच्यावर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकून पसरवल्याचा आरोपही आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर एका स्थानिक राजकारण्याचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. यामुळे कारवाईत पोलिसांवर दबाव निर्माण होत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, आम्ही निःपक्षपातीपणाने याबाबत तपास करत असल्याचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Beed Violence Case :
PM Modi- Shah : मोदी- शाहांच्या गुजरातपेक्षा 'बीड' ठरलं 'भारी'; नेमकं काय आहे प्रकरण ?

आतापर्यंत दोन हजार जणांची चौकशी -

बीड जाळपोळ आणि हिंसाचारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. संशयितांवर पोलिसांची करडी नजर आहे. यासाठी पथकांची विभागणी करून शोध घेण्यात येत आहे. बीडच्या पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तब्बल 2 हजार जणांची चौकशी केली आहे.

चौकशीतून आतापर्यंत 254 जणांना ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये 17 अल्पवयीन संशयितांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीला जामीन मिळालेला नाही. एकूण तेरा आरोपींनी आतापर्यंत जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचाही जामीन नाकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक ठाकूर यांनी दिली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com