Mumbai News : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा, अवकाळी पाऊस, आगामी हिवाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.
इतर मुद्द्यांसह प्रामुख्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेली शिंदे समिती रद्द करण्यात यावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यामुळे मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार पुढील आठवडाभरात नुकसानग्रस्त १६-१७ जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण करून हिवाळी अधिवेशनात मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
केंद्र सरकारच्या निकषांपेक्षा वाढीव मदत देण्यावर राज्य सरकारकडे प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती आहे. आपत्ती व पुनर्वसन खात्याकडून अल्पभूधारक शेतकरी आणि ७० टक्क्यांहून जास्त नुकसान झालेल्या फळबागांसाठी अतिरिक्त मदतीची रक्कम थेट खात्यावर जमा केली जाणार असल्याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे.
अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे राज्यातील ९९ हजार हेक्टरवरील फळबागा, भाजीपाला, ऊस, कापूस, कांदा, द्राक्ष आणि अन्य पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती मंत्रिमंडळासमोर सादर केली जाणार आहे. राज्यातील पीक पाणी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आज मंत्रिमंडळ बैठकीत इतर मुद्द्यांसह प्रामुख्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेली शिंदे समिती रद्द करण्यात यावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यामुळे मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भातदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गतच्या पुनर्वसन सदनिका विहित मुदतीनंतर हस्तांतर करताना आकारण्यात येणाऱ्या हस्तांतर शुल्कात कपातीबाबत चर्चा
भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूमिकेवर कामगिरी लेखापरीक्षण अहवाल मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर होणार
मराठी भाषा भवन, महाराष्ट्र, मुंबई या इमारतीच्या सुधारीत आराखड्याचे सादरीकरण
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.