Manoj Jarange Patil Welcome sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : तब्बल 14 तास मनोज जरांगेंची वाट पाहिली, पहाटे तीनला...

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांनी साल्हेर-मुल्हेर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. या दौऱ्यात ते दुपारी एकला नांदगावमार्गे अंतरावली सराटी येथे जाणार होते.

Sampat Devgire

Nashik News : मराठा आरक्षणासाठी शेवटचा लढा देत असल्याचे मनोज जरांगे पाटील सांगत आहेत. सरकारने काढलेल्या अधिसूचनेचा कायदा करावा यासाठी पुन्हा 10 फेब्रुवारीपासून ते उपोषण करणार आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. मनोज जरांगे गुरुवारी (ता.8) दुपारी एकला नांदगाव येथे येणार होते. मात्र, प्रवासात ठिकठिकाणी झालेल्या स्वागतामुळे ते नांदगावला शुक्रवारी (ता.9) पहाटे तीनला पोहोचले. तब्बल 14 तास उशीर होऊनही त्यांच्या स्वागतासाठी दुपारी झालेली गर्दी तसूभरदेखील कमी झाली नाही. (Maratha Reservation News)

जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांनी साल्हेर-मुल्हेर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. या दौऱ्यात ते दुपारी एकला नांदगावमार्गे अंतरावली सराटी येथे जाणार होते. त्यामुळे नांदगावमध्ये त्यांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच जोरदार तयारी करण्यात आलेली होती. शेकडो कार्यकर्ते त्यात व्यस्त होते.

दुपारी एकपासून पहाटे तीनपर्यंत हजारो नागरिक या स्वागतासाठी ताटकळत थांबून होते. मात्र, गर्दी अजिबात कमी झाली नाही. पहाटे तीनला जरांगे पाटील यांचे जेसीबीने हार घालत फुले उधळत, प्रचंड घोषणा देत, त्यांचे जंगी स्वागत झाले. पाऊण तास स्वागताचा हा कार्यक्रम सुरू होता. पहाटे तीनलाही हजारो नागरिक उपस्थित असल्याने जरांगे पाटीलदेखील भावूक झाले होते.

मंत्र्यांना धडा शिकवा

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न अद्याप संपलेला नाही. आपल्याला खूप जागरूक राहावे लागेल. आपल्या पदरात काय पडले, हे येत्या 10 फेब्रुवारीला स्पष्ट होईल. त्यावेळी मी पुढील उपोषणाचा निर्णय स्पष्ट करणार आहे. गोरगरीब समाज बांधव आणि तरुण मुले, बेरोजगार यांच्यासाठी जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्न काही स्वार्थी पुढारी, मंत्री अपशकून करून अवघड करीत आहेत. त्यांना धडा शिकवा, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केले.

भुजबळांना धडा शिकवण्याचे आवाहन

मनोज जरांगे-पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली. नाशिक हा अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक जिल्हा आहे. येथे तुम्ही 20 वर्षे अशा समाजद्रोही व्यक्तींना कसे पदावर ठेवले. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यांची योग्य जागा दाखवा. बहुजन समाजाला दुखवून आणि त्यांच्यात फूट पाडून आपला राजकीय स्वार्थ साधणाऱ्यांना जागरूक झालेला समाज आता स्थान देणार नाही, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.

(Edited By Roshan More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT