Maratha Reservation : ॲड. सदावर्तेंना बारसकरांनी माहिती पुरवली; मराठा समाजाच्या बैठकीत दाखवला भेटीचा फोटो...

Mohol Maratha Community Meeting : मंत्री छगन भुजबळ, ॲड. सदावर्ते आणि बारसकर यांचा या वेळी निषेध करण्यात आला.
Ramesh Baraskar-Adv Gunaratna Sadavarte
Ramesh Baraskar-Adv Gunaratna Sadavarte Sarkarnama

Solapur News : मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी माहिती पुरवल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. मराठा आरक्षणाला विरोध दर्शविणारे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, ॲड. सदावर्ते आणि बारसकर यांचा या बैठकीत निषेध करण्यात आला. (Ramesh Baraskar provided information to Adv Gunaratna Sadavarte against Maratha reservation)

दरम्यान, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात आपण ॲड. सदावर्ते यांना कोणतीही माहिती पुरविली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी मोहोळ तहसील कार्यालयातून विलंब होत असल्याच्या तक्रारीसंदर्भात सकल मराठा समाजाची मोहोळच्या शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकी कुणबी दाखल्यांचे वाटप आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. (Maratha reservation)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramesh Baraskar-Adv Gunaratna Sadavarte
Madha Loksabha : माढ्यात दोन सिंहांमध्येच होणार लढत...शरद पवार गटाकडून ‘हे’ नाव निश्चित?

सकल मराठा समाजाच्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भेटीचा फोटो दाखवला. बारसकर यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात सदार्वेत यांना माहिती पुरवली, असा आरोपही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेले पदाधिकारी चांगलेच संतापले होते. मंत्री छगन भुजबळ, ॲड. सदावर्ते आणि बारसकर यांचा या वेळी निषेध करण्यात आला.

Ramesh Baraskar-Adv Gunaratna Sadavarte
Jarange On Raj Thackeray : नाशिकचं पाणीच वेगळं हाय; राज ठाकरेंच्या प्रश्नावर जरांगे पाटलांचं उत्तर

दरम्यान, मराठा-कुणबी दाखल्यांसाठी मोहोळ तालुक्यातून आजपर्यंत सुमारे 500 अर्ज दाखल झाले आहेत, त्यापैकी सुमारे 200 अर्जदारांना कुणबी मराठा दाखले मिळाले आहेत. उर्वरित 300 अर्ज अजूनही कुणबी दाखल्यांसाठी प्रलंबित आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाचे संतोष गायकवाड यांनी दिली.

गायकवाड म्हणाले, कुणबी दाखल्यांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मराठा समाजाच्या बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची भेट घेऊन मराठा समाजाला तातडीने कुणबी-मराठा दाखले वितरित करावेत, अशी मागणी केली. तहसील कार्यातील काही कर्मचारी हे उद्धटपणे वागत असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली. वंशावळीच्या संदर्भातला प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न होईल, असे तहसीलदारांनी सांगितले.

Ramesh Baraskar-Adv Gunaratna Sadavarte
Bhagirath Bhalke : स्पेशल प्लेन पाठवलं...प्रवेशाला अख्खं मंत्रिमंडळ आलं...तरीही भगीरथ भालके BRSमध्ये सक्रिय होईनात

तो फोटो 2003 मधील : रमेश बारसकर

या संदर्भात मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर म्हणाले, मोहोळ नगरपरिषदेच्या वॉर्ड रचनेच्या प्रकरणावेळी माझी आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची ओळख झाली होती. मराठा समाजाच्या बैठकीत दाखवण्यात आलेला फोटो हा 2003 मधील आहे. त्यावेळी एका महिलेला न्याय देण्याच्या अनुषंगाने सदावर्ते यांच्याशी भेट झाली होती. त्या भेटीचा चुकीचा अर्थ लावून विरोधक त्याचे भांडवल करत आहेत. मी कुठल्याही स्वरूपाची माहिती सदावर्ते यांना दिलेली नाही.

Ramesh Baraskar-Adv Gunaratna Sadavarte
Nashik News : मंत्र्याची एन्ट्री अन् कांद्याच्या राजधानीत राजकारणच फिरलं; सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com