Maratha Resrvation News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : कोंबडी चोर-कोंबडी चोर...; घोषणाबाजीसह मंत्री राणेंना दाखवले काळे झेंडे!

Ahmednagar Political News : कोंबडी चोर.., एक मराठा लाख मराठा... राणे चले जाव.., अशी घोषणाबाजी केली.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर नेहमीच शंका घेणारे भारतीय जनता पार्टीचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नगर दौऱ्यावर असताना सकल मराठा समाजाच्या आंदोलकांच्या गनिमी काव्याने दणका दिला. राणे यांना सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी दोन ठिकाणी 'कोंबडी चोर', अशी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले. तर एक ठिकाणी पोलिसांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, नारायण राणे यांनी मात्र झेंडे दाखवणाऱ्यांना समोर येण्याचे आव्हान देत, यांची एवढी हिमंत नसल्याचे म्हटले आहे. (Latest Marathi News)

अकोळनेर (ता. नगर) येथे आत्मनिर्भर स्टील प्रोसिसिंग क्लस्टर सीएफसीच्या उद्घाटनासाठी नगरमध्ये आज आले होते. नगर पोलीस मुख्यालयातील मैदानावर यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले होते. मंत्री नारायण राणे तेथे उतल्यानंतर पुढे वाहनाने अकोळनेरकडे रवाना होणार झाले. याचवेळी पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सकल मराठा समाजाचे आंदोलक उभे होते. त्यांच्या अंगावर काळे कपडे होते. काही जण काळे कपडे घेऊन आले होते. तोफखाना पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. एवढ्यात मंत्री राणे यांच्या वाहनांचा ताफा पुढे सरकत होता. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पुढे दिल्ली दरवाजा येथे काही आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी मंत्री नारायण राणे यांच्या वाहनांचा ताफा येताच काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे पोलिसांची येथे चांगलीच धावपळ उडाली. वाहनांचा ताफा पुढे सरकताच नगर-पुणे रोडवरील सक्कर चौकात उड्डाणपुलाजवळ सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी गर्दी केली. तिथे वाहनांचा ताफा पोहोताच मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी वाहनांना काळे झेंडे दाखवण्यास सुरूवात केली. कोंबडी चोर.., एक मराठा लाख मराठा... राणे चले जाव.., अशी घोषणाबाजी केली. काही मराठा आंदोलक हे वाहनांना आडवे होऊन काळे झेंडे दाखवत होते. वाहनाच्या ताफ्यामागे काळे झेंडे घेऊन पळत होते. दिल्ली दरवाजा आणि उड्डाणपुलाजवळ सकल मराठा समाजाकडून आंदोलन होणार आहे, याची पूर्वकल्पना नसल्याने स्थानिक पोलिसांनी चांगलीच धावपळ झाली. पोलिसांनी सकल मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सकल मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत, अशी विचारणा केल्यावर मंत्री राणे संतापले. मंत्री राणे म्हणाले, "कोणाला? मला नाही दाखवले. कोणी दिसले नाही. आणि माध्यमांनी लगेच न्यूज चालवली. हे चुकीचे होत आहे. समोर या ना. मला दिसू द्या ना, काळा रंग कसा दिसतो. एवढी हिंमत नाही हो यायची". तुम्हाला विकासाविषयी नाही. तुम्हाला काळे झेंडे. जय हिंद... जय महाराष्ट्र.., असे म्हणत मंत्री राणे माध्यमांसमोरून निघून गेले. मंत्री नारायण राणे यांची ही कृती चर्चेत आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT