Hasan Mushrif Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hasan Mushrif News : वैद्यकीय विद्यार्थी चिंतेत अन् मंत्री हसन मुश्रीफ मात्र निश्चिंत?

Hasan Mushrif and Medical students : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी अत्यंत थोडका अवधी शिल्लक आहे, मात्र...

Sampat Devgire

Medical Students News: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. कारण, परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी महाराष्ट्रात रखडली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळणार की एक वर्ष वाया जाणार ही चिंता सतावत आहे.

परदेशातून शिक्षण घेऊन आलेले विद्यार्थी राज्यातील शासकीय व अन्य रूग्णालयात इंटर्नशीप करतात. हे त्यांना बंधनकारक असते. त्यानंतरच त्यांची महाराष्ट्र राज्य वैद्यकीय कौन्सिलकडे नोंदणी केली जाते. वैद्यकीय व्यवसाय तसेच पुढील शिक्षणासाठी ही नोंदणी सक्तीची आहे.

सध्या महाराष्ट्रात 882 परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले विद्यार्थी विविध शासकीय निमशासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये इंटर्नशीप करीत आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य शासनाकडून त्यांच्या पुढील प्रक्रियाबाबत निर्णय रखडला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांपुढे सध्या चिंतेचे वातावरण आहे. या नोंदणीसाठी 20 जानेवारी 2024 ला परीक्षा देण्यात आली होती. त्याचा निकाल फेब्रुवारी 2024 मध्ये जाहीर झाला, त्यानंतर या विद्यार्थ्यांनी इंटर्नशीप सुरू केली आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी अत्यंत थोडका अवधी शिल्लक आहे. हा प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी गेली अनेक महिने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनाही निवेदन देण्यात आले आहे मात्र मुश्रीफ निश्चिंत असल्याचे सध्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र अनिश्चित आहे गेल्या आठ महिन्यांपासून प्रोव्हिजनल नोंदणी होऊ शकलेली नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांना 2025 च्या नीट परीक्षेत भाग घेता येणार नाही तसे झाल्यास त्यांना पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे

देशातील विविध राज्यांनी याबाबत यापूर्वीची प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यामुळे अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेत भाग घेण्यासाठी कोणतीही अडचण नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी मात्र संकटात सापडले आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ या संदर्भात एवढे निश्चिंत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT