Karad News, 12 Feb : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीच मुस्लिम नव्हतं", असं वक्तव्य राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवाय हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
नितेश राणेंच्या याच वक्तव्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधीच केला नाही. शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती.
त्यांनी जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीतच असतो, असं म्हणत त्यांनी राणेंचा दावा मोडीत काढला आहे. कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, "मी नितेश राणे यांचे वक्तव्य ऐकलेलं नाही.
मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. त्यांनी जर हिंदु मुस्लिम असा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो." शिवाय नितेश राणेंना (Nitesh Rane) औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चाललंय, ते खोदून काढावं असं म्हणायचं असेल.
मी देखील अनेकदा सांगितलं आहे की औरंगजेब आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण आजही गुलामगिरीतच असतो, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. दरम्यान, मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार देखील मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.
ज्या दुकानात मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथून मांस खरेदी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यांच्या या भूमिकेबाबत उदयनराजेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं.", असं म्हणत त्यांनी या प्रकरणावर जास्तीचं बोलणं टाळलं.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.