Mehboob Shaikh News: नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे प्रचार सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
चाळीसगाव निवडणुकीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने येथे स्वबळावर पॅनल केले आहे. त्यांच्या पॅनलची (कै) राजीव दादा देशमुख यांच्या अनुयायांशी संबंधीत विकास आघाडीच्या उमेदवारांशी लढत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने चाळीसगाव नगरपालिकेसाठी विरोधकांची मोट बांधली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि अन्य नेते प्रचारात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मेहबूब शेख यांची सभा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत भाजपच्या पॅनलला मतदानाचे आवाहन करण्यात आले होते. भाजपची सत्ता आल्यास चाळीसगाव नगरपालिकेसाठी राज्य सरकारची दारे सदैव खोली राहतील असे आश्वासन देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मेहबूब शेख यांची सभा झाली. मेहबूब शेख यांनी मुख्यमंत्री आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. राज्यात सत्ता आणि आमदार भाजपचा असतानाही एवढी सत्याची हाव का? असा प्रश्न त्यांनी केला.
नगरपालिका निवडणुकीत देखील मतदारांना भ्रमित करण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे. हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये वाद पेटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. साठीच वादग्रस्त राजकीय विधाने केली जात आहेत.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. आमच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असल्याचा दावा मुख्यमंत्री करतात. मग हिंदू असुरक्षित कसे? असा प्रश्न शेख यांनी केला.
राज्यात अथवा देशात कोणीही नागरिक अथवा धर्म धोक्यात नाही. हिंदू तर अजिबातच संकटात नाहीत. गटात असतील तर भाजप नेत्यांच्या सत्ता आणि खुर्च्या संकटात आहेत. हिंदू संकटात असल्याचा डांगोरा त्यासाठीच पिटला जात आहे.
चाळीसगाव शहर आणि मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मोठा विकास झाला आहे. या शहरावर माजी आमदार राजीव दादा देशमुख यांचा प्रभाव आहे. त्यामुळेच पद्मावती देशमुख किमान दहा हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा शेख यांनी केला.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.