NCP Agitation at Niphad
NCP Agitation at Niphad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संतप्त राष्ट्रवादीचा एल्गार, महाराष्ट्राचा गद्दार... अब्दुल सत्तार..अब्दुल सत्तार!

Sampat Devgire

निफाड : खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांच्या विषयी गलिच्छ भाषेचा (dirty language) वापर करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांच्याविषयी राज्यातील (Maharashtra) सर्वच नागरिक व कार्यकर्ते संतप्त आहेत. याबाबत सतत साधन शुचीतेच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्ष (BJP) व त्यांचे नेते गप्प का?. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सत्तार यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (NCP) दिला आहे. (NCP workers agitation against Agriculture minister Abdul Sattar)

कृषीमंत्री सत्तार यांच्या विरोधात निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पिंपळगाव टोल नाक्यावर निषेध करीत तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी सत्तार हे असभ्य आणि मंत्रीपदाला योग्य नाहीत, हे त्यांच्या वर्तनातून वारंवार सिद्ध झाले आहे. संविधानिक पदावरील व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारे गलिच्छ वक्तव्य करते. ते देखील संसदरत्न म्हणून गौरविलेल्या महिला खासदारांविषयी असभ्य भाषेत बोलते. हे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापर आहे. ही सत्तेची मस्ती जास्त दिवस नसेल. अब्दुल सत्तार यांचा माज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उतरवल्या शिवाय शांत बसणार नाहीत, असा इशारा दिला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भुषण शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, नवाझ काझी, चंद्रकांत विधाते, श्रीकांत वाघ, तालुका उपाध्यक्ष राहुल ढोमसे, गोकुळ झाल्टे, रोहन होळकर, अमित धारराव, भावेश मंडलिक, सद्दाम पिंजारी, कृष्णा शेजवळ, अमोल दाते, देविदास टर्ले, प्रणय निकम, लक्ष्मण गांगुर्डे, अक्षय गांगुर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT