Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon BJP Politics: गिरीष महाजनांचा भाजप नगरसेवकांवरच अविश्वास?

Sampat Devgire

Jalgaon No Confidence Motion: जळगाव महापालिकेत आयुक्त विरूद्ध नगरसेवक असे टोकाचे चित्र निर्माण झाले. त्यातूनच आयुक्तांविरोधात नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. मात्र त्यात हस्तक्षेप करीत गिरीश महाजनांनी भाजप नगरसेवकांचेच कान टोचले. त्यामुळे हा अविश्वास बारगळला आहे. (BJP with all party corporators submit no confidence motion against commissioner)

जळगाव (Jalgaon) महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर असताना आयुक्त विद्या गायकवाड यांच्या विरोधात हा अविश्वास प्रस्ताव आणला होता. मात्र त्यात भाजप (BJP) मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी स्वपक्षाच्या नगरसेवकांचे कान टोचल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे.

भाजपचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली होती. खरे तर महापालिकात शिवसेनेची (ठाकरे गट) सत्ता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय भूमिका पक्षाचा उत्साह वाढवणारी होती.

त्यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची मोट बांधली होती. त्यांनी ठाकरे गट, शिंदे गटाची मोट बांधत आयुक्तांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यातूनच हा अविश्वास आणला होता. मंगळवारी होणाऱ्या महासभेत त्यावर निर्णय होणार होता.

या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने जळगाव शहराचे राजकारण ढवळून निघाले होते. शहरात हाच एक महत्त्वाचा विषय असल्यासारखी त्यावर चर्चा होत होती. मात्र जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी आयुक्त विद्या गायकवाड यांच्याशी चर्चा केली.

या प्रश्नावर काय तोडगा काढायचा याबाबत विचारविनिमय झाला. त्यातून त्यांनी स्वपक्षाच्या नगरसेवकांचे कान पिळले. त्यामुळे मंगळवारी जेव्हा महासभा झाली तेव्हा नगरसेवकांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे गणपूर्ती अभावी महासभा तहकूब झाली. आता हा अविश्वास प्रस्ताव बारगळला आहे.

महापौर जयश्री महाजन यांनी मंगळवारी महासभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली आहे. त्यात जे राजकारण घडले, त्यात भाजपच्या नगरसेवकांच्या राजकारणावर एक प्रकारे स्वपक्षाच्या नेत्यांनीच अविश्वास दाखविल्याचे चित्र दिसले. आयुक्तांवर अविश्वास आणायला गेले आणि स्वतःचाचा विश्वास गमावून बसले अशी स्थिती भाजपच्या नगरसेवकांची झाल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT