Chhagan Bhujbal, Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narhari Zirwal Politics : मंत्री झिरवाळ यांचे भुजबळांबाबत मोठे विधान; म्हणाले, ते सरकारमध्ये असणे अनेकांना..!

Narhari Jhirwal, Chhagan Bhujbal, Maharashtra government, political news, Indian politics, cabinet ministers : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी माजी मंत्री छगन भुजबळ नाराज नसल्याचे सांगितले.

Sampat Devgire

Nashik News : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, असा दावा केला. पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात. ते जो निर्णय घेतील तो आनंदाने स्वीकारू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयीही भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात, असे बोलले जात आहे. याविषयी मंत्री झिरवाळ यांना विचारणा केली. त्यावर झिरवाळ म्हणाले, मी स्वतः अधिवेशन दरम्यान माजी मंत्री भुजबळ यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली ते नाराज आहेत, हे खरे आहे. मात्र त्यावर नक्की तोडगा काढला जाईल. हा विषय फार ताणला जाणार नाही, असे मला वाटते.

माजी मंत्री छगन भुजबळ हे सरकारमध्ये असणे अनेकांना आवश्यक वाटते. त्या दृष्टीने महायुतीचे नेते नक्कीच परस्परांत चर्चा करून त्यावर मार्ग काढतील. महायुतीचे नेते याबाबत काहीतरी तोडगा काढून समन्वय प्रस्थापित करतील, असा विश्वास मंत्री झिरवाळ यांनी व्यक्त केला. छगन भुजबळ यांना ओळखणे खूप अवघड आहे. त्यांच्या मनात काय सुरू आहे, याची मला नक्की खात्री नाही. मंत्रपद मिळाले नाही यापेक्षा त्यांना योग्य वागणूक मिळाली नाही, याची त्यांना खंत आहे, असेही झिरवाळ म्हणाले.

माजी मंत्री भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतच राहतील. त्यात काहीही तडजोड होणार नाही. भुजबळ भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता अजिबात नाही, असा मोठा दावाही मंत्री झिरवाळ यांनी केला.

अन्न व औषध प्रशासन हा विभाग झिरवाळ यांना देण्यात आला आहे. या खात्याची विशेष माहिती मला नाही. मात्र याबाबत मी माहिती घेऊन आणि तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन यातील विषय समजून घेण्याचा प्रयत्न करीन. सध्या सर्व पातळीवर मोठ्या प्रमाणावर भेसळ असल्याचे दिसते. ही भेसळ कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याला मी प्राधान्यक्रम देणार असल्याचे झिरवाळ म्हणाले.

आदिवासी भागात अनेक आयुर्वेदिक आणि वन औषधी उपलब्ध आहेत. त्याला चांगला गुण देखील आहे. अनेक वैद्य आणि तज्ञ त्याचा विविध आजारांवर उपयोग करतात. या संदर्भात प्रगत वैद्यकीय तंत्र आणि औषधांसोबत आयुर्वेदाने वनौषधीचा मेळ बसवता येईल का? यावर मी काम करीन. अनेक लोक वनौषधी चा वापर करून अनेक आजारातून बरे होतात. कोरोनाच्या कालखंडात देखील ही औषधी उपयोग ठरल्याचे उदाहरण आहे, असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT