Suresh Dhas News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर निशाणा आमदार सुरेश धस साधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेमधील आमदार, प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ट्विट करत धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचं पद्धतशीर काम सुरेश धस करत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना धस यांनी मिटकरींना दम भरला आहे.
'अमोल मिटकरी फार लहान आहे. माझी त्याला विनंती आहे तू कोणाच्याही नादी लाग या रगेलच्या नादी लागू नको. तुला लय महागात पडेल. एकदा तुझे ऐकूण घेतो, वडीलकीच्या नात्याने समज देतो, तुझं दुकान कुठेही चालव माझ्यावर चालवू नको नाहीतर तुझं अवघड होईल.', असे सुरेश धस म्हणाले.
वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांचे संबंध असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना धस म्हणाले, आमचे एकच मिशन आहे संतोष देशमुखच्या आरोपींना अटक झाली पाहिजे. आमचे संबंध आहे म्हणतात तर ते कसे आहेत ते देखील सांगा मधूर, अमधूर, समधूर नेमके कसे आहेत ते देखील सांगा असे प्रतिआव्हान देखील धस यांनी मुंडेंना दिले.
माझे आणि धनजंय मुंडे यांचे देखील मैत्रीचे संबंध होते. मात्र हे मैत्रीचे संबंध कधी तुटले. कोणत्या तारखेपासून तुटले हे मी लोकांना सांगू शकतो. त्याचे कारणही सांगू शकतो माझ्याकडे कागद आहे, असे देखील सुरेश धस म्हणाले.
सुरेश धस यांना केलेल्या वक्तव्याला अमोल मिटकरी यांनी ट्विट करत प्रत्युत्त दिले आहे.'आमदार सुरेश धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्याने घ्यावं. महागात पडेल म्हणजे काय ?यावरून यांची एकंदरीत कारकीर्द लक्षात येते. गृह विभाग व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन धस यांचेवर योग्य ती कारवाई करावी.', अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.