Narhari Zirwal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narhari Zirwal Politics: मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती अस्वस्थ, मुंबईच्या रुग्णालयात दाखल!

Narhari Zirwal is Undergoing Treatment at Mumbai's Saifee Hospital: अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ उपचारासाठी मुंबईच्या सेफी रुग्णालयात सुरू आहेत उपचार.

Sampat Devgire

Narhari Zirwal News: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बरी नाही. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना मुंबईच्या सेफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक आठवड्यापूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री झिरवाळ यांना मूत्रपिंडाचा त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांच्या सूचनेनुसार रुग्णालयात दाखल केले होते. गेले आठ दिवस त्यांच्यावर उपचार झाले. या उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता ते बरे झाले असल्याचे निकटवर्ती यांनी सांगितले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री झिरवाळ यांची प्रकृती आता एकदम व्यवस्थित आहे. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यात लक्षणीय सुधारणा झाली. त्यामुळे आज सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ...

मंत्री झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आहेत. यंदा ते चौथ्यांदा विजयी झाले. यापूर्वी त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून देखील कामकाज पाहिले आहे. यंदा त्यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.

मंत्री झिरवळ यांचा जन्म १९५९ मध्ये झाला. त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर काही काळ शासकीय नोकरी देखील केली. तहसीलदार कार्यालयात ते कारकून होते. मात्र त्यांनी नोकरी सोडली. वडिलांबरोबर ते आदिवासी पारंपरिक बोहाडा व जागरणाचे कार्यक्रम देखील करीत होते. त्यामुळे त्यांना आदिवासी पारंपारिक नृत्य, संस्कृती आणि परंपरा या संदर्भात माहिती आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये गेल्या वाटते आवर्जून त्यात सहभागी होत संगीत आणि नृत्य देखील सादर करतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT