Sharad Pawar Politics: जळगावचे नेते एकवटले, म्हणाले, आम्ही निवडणुकांसाठी तयार, विरोधकांना दिले आव्हान!

NCP Sharad Pawar;NCP Jalgaon leaders are determined to win the upcoming elections-जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची आढावा बैठक उत्साहात.
Ajit Pawar & Sharad Pawar
Ajit Pawar & Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव जिल्ह्यातील नेत्यांचे अजित पवार पक्षात प्रवेश झाले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींचे नेते एकत्र येणार यावर विविध नेत्यांनी वक्तव्य केली. या गोंधळात जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी बैठक घेतली.

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी झाली. बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाच्या कार्यकर्ते आणि इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

Ajit Pawar & Sharad Pawar
Eknath Shinde Politics: शिवसेना शिंदे पक्षात गटबाजी उफाळली...पदाधिकाऱ्यांची आज एकनाथ शिंदेंकडे धाव?

माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि डॉ सतीश पाटील यांसह दोन माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावमध्ये प्रवेश सोहळा घेण्याच्या तयारीत होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांनी बैठक घेतली.

Ajit Pawar & Sharad Pawar
Eknath Khadse On Drug Case : ड्रग्स प्रकरण वेगळ्या वळणावर, सत्ताधाऱ्यांचा एक स्वीय सहायक दडपतोय; एकनाथ खडसेंच्या दाव्यानं चर्चेला तोंड फुटलं!

या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री एकनाथ खडसे, निरीक्षक भास्करराव काळे माजी आमदार संतोष चौधरी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील, शहरप्रमुख एजाज मलिक, महिला आघाडीचे अध्यक्ष मंगला पाटील यांसह मोठ्या संख्येने नेते उपस्थित होते.

बैठकीत ग्रामीण भागातील कार्यकर्ते अतिशय आक्रमक होते. त्यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या सर्व यंत्रणांनी सक्रिय व्हावे. आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अतिशय जोमाने लढेल, असा दावा त्यांनी केला. यावेळी जळगाव ग्रामीण, धरणगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा यांसह विविध भागातील पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडली.

यावेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांना संयमाने आणि जबाबदारीने वाटचाल करण्याची सूचना दिली. विरोधक अफवा पसरवीत आहेत त्यावर विश्वास ठेवू नये. ज्येष्ठ नेते शरद पवार घेतील ती भूमिका सगळ्यांना मान्य असेल. असे सांगत एक प्रकारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत 'टायगर अभी मैदान मे है' असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन माजी मंत्र्यांसह काही नेत्यांनी पक्ष सोडला. भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांचे मनोबल वाढले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी वेसन घालण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com