MP Nilesh Lanke 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pratap Sarnaik transport department : एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडील खात्याचे कार्यालय खासदार लंकेंच्या 'रडार'वर; 'कथित कार्ड सिस्टम'च्या पोलखोलची तयारी

MP Nilesh Lanke Seeks Details on Transport Dept Action Against Farmers Vehicles in Ahilyanagar : अहिल्यानगरमधील प्रादेशिक कार्यालयाच्या 'कथित कार्ड सिस्टम'वर खासदार नीलेश लंके पत्रकार परिषद घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar transport department controversy : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खात्याच्या अहिल्यानगर प्रादेशिक कार्यालयाचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्या 'रडार'वर आला आहे.

शेतकऱ्यांच्या वाहनांवर केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे खासदार लंके संतापले असून, कार्यालयाच्या 'कथित कार्ड सिस्टम'च्या तक्रारींवर लवकर पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करण्याचा इशारा दिला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील परिवहन विभागाकडून मागील सहा महिन्यांतील वाहनांवरील कारवाई व आकारलेल्या दंडाचा सविस्तर तपशील तातडीने सादर करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या (Farmer) वाहनांवर होत असलेल्या कथित अवास्तव दंडात्मक कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांनी या विभागाला थेट इशारा दिला आहे.

खासदार लंके (Nilesh Lanke) यांच्या कार्यालयाकडे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांकडून वाहनांवर दंडात्मक कारवाई होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतमालाची बाजारपेठेत वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, जीप, पिकअप, मिनी-ट्रक यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दंड आकारल्याच्या या तक्रारी आहेत.

नगर, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत आणि जामखेड या आठ तालुक्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांत झालेल्या सर्व कारवायांचा तपशील देण्याची मागणी खासदार लंकेंनी पत्राद्वारे केली आहे. त्यात वाहनाचा प्रकार, कारवाईची संख्या, आकारलेला दंड, संबंधित कायदा व नियम यांचा समावेशाच तपशील खासदार लंकेंनी मागितला आहे. हा तपशील संसदीय कामकाजासाठी तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे खासदार लंकेंनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

तसंच परिवहन विभागात 'कथित कार्ड सिस्टम' सुरू आहे, याबाबत देखील गंभीर तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्या असल्याचे खासदार लंके यांनी म्हटले आहे. या संदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन, सत्य काय आहे ते समोर आणू, अशी माहिती त्यांनी दिली.

अहिल्यानगर प्रादेशिक कार्यालयाची 'कथित कार्ड सिस्टम' अनेक काही वर्षांपासून चर्चेत आहेत. याबाबत छुप्यापद्धतीने चर्चा होत असते. परंतु, अशा छुप्यापद्धतीच्या सिस्टमवर खासदार लंकेंनी भूमिका घेतल्याने ही 'कथित कार्ड सिस्टम' पुन्हा चर्चेत आली आहे. खासदार लंकेंनी पत्रकार परिषद घेण्याची तयारी केल्याने, ती कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT