Radhakrishna Vikhe sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Lok Sabha Exit Poll 2024 : एक्झिट पोलविरोधात? मंत्री राधाकृष्ण विखेंचा पुत्र सुजयसाठी 'आशीर्वाद' आणि 'मार्गदर्शना'वर भरवसा!

Lok Sabha Election 2024 Result : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबतचा एक्झिट पोल फेटाळून लावत भाजप उमेदवार खासदार सुजय विखे मताधिक्यांनी निवडून येतील, असा दावा केला आहे.

Pradeep Pendhare

BJP Minister Radhakrishna Vikhe : भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा मार्गदर्शनाची आठवण झाली आहे. विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडणीस यांचे मार्गदर्शन उमेदवार खासदार सुजय विखेंना असल्याने ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.

नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे जात असल्याचा एक्झिट पोल असून, भाजप (BJP) नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावर ते फक्त 'एक्झिट पोल' आहेत, असे म्हटले आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हीच जिंकणार हा पहिल्यापासूनचा विश्वास आहे. समाज माध्यमांमध्ये पेरलेल्या विषचा थोडा परिणाम झाला. पण जनतेला कामावर विश्वास आहे. त्यापेक्षाही विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आम्हा पक्षाला आणि उमेदवारांना लाभले आहे.

डाॅ. सुजय विखे यांना त्यांचे आशीर्वाद आहेत. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे मार्गदर्शन आहे. त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे नगर दक्षिणची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकणार, असा विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला.

काँग्रेसला चिमटा

राधाकृष्ण विखे म्हणाले, राज्यात महायुती काय आहे ते, चार जूनला निकालाच्या दिवशी कळले. महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळेल. हे सर्व 'एक्झिट पोल' आहेत. राजकीय विश्लेषक त्यांचे मत व्यक्त करत आहेत. सर्वांची उत्तरे ही चार जूनच्या मतमोजणीला कळून जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर लोकांनी विश्वास केला. त्यामुळे महायुती देशात चारशे पार होत आहे. काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेता होण्याची संख्या गाठली तरी पुष्कळ झाले, असा चिमटा विखेंनी काँग्रेसला काढला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयोगाकडून परवानगी नाही

दुष्काळ परिस्थिती तीव्र आहे. त्यावर काही तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आढावा घेणे गरजेचे आहे. यासाठी निवडणूक आयोगाला आम्ही संपर्क साधला. परंतु निवडणूक आयोगाकडून कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही, असे दिसते आहे. यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागली आहे. तरी देखील चारा टंचाईच्या बाबतीत पूर्वीच पशुसंवर्धन विभागामार्फत उपाययोजना केल्या आहेत. पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे. पाणी पातळीवर घटत चालली असली, तरी सर्व उपाययोजना केल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT