Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या 48 तासांवर आला असताना माजी आमदार नीलेश लंके यांनी भाजप उमेदवार खासदार सुजय विखेंची झोप उडवली आहे. निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. "समोरेच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर असलेले निम्मे नेते आतून माझ्याबरोबर होते. त्यामुळे शंभर टक्के नाही, मीच निवडून येत असतो", असे नीलेश लंके यांनी म्हटले आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे माजी आमदार नीलेश लंके यांच्या थेट लढत आहे. मतमोजणी अवघ्या 48 तासांवर आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांकडून विजयाचे दावे केले जात आहे. महाविकास आघाडीतील नेते यांनी देखील नीलेश लंके दीड लाख मतांनी विजय होणार असे सांगत आहे.
नीलेश लंके यांनी देखील विजयाबाबत मोठा गौप्यस्फोट करत भाजप (BJP) खासदार सुजय विखे यांची झोप उडवून देणारे विधान केले आहे. हे करताना त्यांनी खासदार विखेंचे नाव टाळले. नीलेश लंके यांच्या विधानामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नीलेश लंके यांनी निकालाचे मला काहीच टेन्शन नाही. टेन्शनचा देखील काहीच संबंध नाही. सर्वसामान्य जनता, शेतकरी माझ्याबरोबर होते. विशेष म्हणजे, समोरेचे उमेदवाराच्या व्यासपीठावर असलेले अनेक नेते आतून माझ्याबरोबर होते. त्यामुळे मला चिंता नाही. शंभर टक्के नाही, मीच निवडून येत असतो, असे म्हणून खळबळ उडवून दिली.
"मी कोणत्याच निवडणुकीची चिंता करत नाही. टेन्शन पण नसते. निवडणुकीनंतर रुटीन चालू आहे. विधानसभेत 50 हजार मतांनी निवडून येणार असा दावा केला होता. परंतु 65 हजार मतांनी निवडून आलो. लोकसभेला समोरे जाताना 'कम से कम दो लाख', असे माझे वाक्य आहे. मी दोन लाख मतांनीच निवडून येणार आहे", असे नीलेश लंके यांनी दावा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.