Ahmednagar : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून चौंडी (ता:जामखेड) इथे यशवंत सेनेचे कार्यकर्ते माजीमंत्री बाळासाहेब दोडतले यांच्यासह आमरण उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान, शनिवारी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे चौंडी इथे उपोषणकर्त्यांची भेट घेऊन राज्य सरकारच्या वतीने शिष्टाईसाठी येणार होते.
विखेंच्या माध्यमातून सरकारकडून धनगर आरक्षणाबाबत काहीतरी ठोस आश्वासन मिळेल अशी अपेक्षा यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना होती. मात्र ऐनवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा चौंडी दौरा रद्द झाल्याने आंदोलक संतापले. त्यांनी विखेंसह राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी(Chaundi) इथे गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाचा आंदोलनकर्त्यांना भेटायला येणारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा दौरा ऐनवेळी कोणतेही कारण न देता रद्द झाल्याचे समजल्यानंतर यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे.
पालकमंत्री विखे यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समजताच यशवंत सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी नगर-सोलापूर महामार्गावर चापडगाव एकत्र आले. त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पालकमंत्री विखे यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच मंत्री विखे यांच्या अंगावर भंडारा टाकत धनगर समाजाच्या(Dhangar) वतीने आरक्षण मुद्यावर लक्ष वेधले होते. यावेळी भंडारा टाकणाऱ्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांच्या(Radhakrishana Vikhe Patil) विरोधात राज्यात अनेक ठिकाणी जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर चौंडी इथे आरक्षण मुद्यावर गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करणारे माजीमंत्री बाळासाहेब दोडतले, आण्णासाहेब सपनवर, सुरेश बंडगर आदींना भेटण्यासाठी पालकमंत्री विखे आज चौंडी येथे येणार होते. तसा शासकीय दौरा नियोजित होता. मात्र ऐनवेळी विखे यांचा चौंडी दौरा रद्द झाला. ही माहिती समजल्यानंतर यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांत संतापाची भावना दिसून आली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.