MLA Devayani Farande : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Devayani Farande : अवैध धंद्यांविरोधात आमदार फरांदे उतरल्या रस्त्यावर; अधिकाऱ्यांची धांदल उडाली!

Arvind Jadhav

Nashik News : नाशिकच्या इंदिरानगर भागातील सायकल ट्रॅक शेजारी झालेल्या अनधिकृत बांधकामामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत धंद्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे रस्त्यावरती उतरल्या आहेत. वर्षानुवर्षे अतिक्रमण काढण्याबाबत चाल-ढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची फरांदे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. यामुळे अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली. (Latest Marathi News)

इंदिरानगर भागात सायकल ट्रॅकच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाले असून, यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धंदे होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे केल्या होत्या. रात्री-अपरात्री मुला मुलींचा वावर आणि त्यातून होणाऱ्या गोंधळामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले होते.

याबाबत नाशिक महानगरपालिकेला तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांनी सदर अनधिकृत बांधकामांवर धडक मोहीम काढली. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, नगररचना विभागाचे एन. एस. शिरसाठ यांच्यासह इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सोनवणे आदी अधिकार्‍यांवर परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.

यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी अशा प्रकारे बेकायदेशीर अतिक्रमण होत असताना नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी काय करत असतात? असा प्रश्न विचारला. तसेच अनेक बांधकामे हे अकृषक परवाना नसलेल्या जागेवर उभे असल्याचे समोर आले. या सगळ्यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे काय? असा सवालही आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला. यावर नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीसा दिल्या आहे. असे उत्तर दिल्यावर बेकायदेशीर बांधकामांना किती वेळा नोटीसा देणार? असा प्रश्न उपस्थित करताना या बेकायदेशीर बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आमदार देवयानी फरांदे यांनी दिले.

या सर्व बेकायदेशीर हॉटेलमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. असे असताना अन्न व औषध प्रशासन यांना मान्यता कशी देते, असा सवाल उपस्थित करताना आमदार फरांदे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त संजय नरगुडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. सदर हॉटेलचे लाईटचे मीटर जप्त करण्यात आले. नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करताना याबाबत कारवाई करण्यात न आल्यास तीव्र आंदोलन करून उपायुक्त नेर यांची खुर्ची जप्त करणे भाग पडेल, असा इशारा आमदार देवयानी फरांदे यांनी दिला.

यावेळी नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, सुनील खोडे, सचिन कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर शेलार, अजिंक्य साने सुनील देसाई उदय जोशी, सुनील फरांदे यांच्या सह स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT