Assembly Winter Session : देवयानी फरांदे यांचा अंधारेंविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव नार्वेकरांच्या कोर्टात

Devyani Pharande Vs Sushma Andhare : अंधारे यांनी दिलेल्या पत्रातील मजूकर अत्यंत चुकीचा आहे.
Devyani Pharande - Sushma Andhare
Devyani Pharande - Sushma Andhare
Published on
Updated on

Nagpur News : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आपल्यावर आरोप केले होते. म्हणून भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्याची परवानगी विधानसभा अध्यक्षांकडे मागितली.

मात्र, तुमचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. मी तो तपासून योग्य तो निर्णय घेईन, असे उत्तर विधानसभा अध्यक्षांनी दिले. त्यामुळे आमदार फरांदे यांच्या अंधारे यांच्या विरोधातील हक्कभंग अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात असणार आहे. (Devyani Pharande will submit proposal of violation of rights against Sushma Andhare to Rahul Narwekar)

आमदार फरांदे म्हणाल्या की, उबाठा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका निनावी पत्राच्या आधारे माझ्याविरोधात पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. अंधारे यांनी दिलेल्या पत्रातील मजूकर अत्यंत चुकीचा आहे. मी गेली 30 वर्षे राजकारणात विविध पदांवर निवडून येत आहे. पुरावा नसताना मी कुणावरही आरोप केलेला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devyani Pharande - Sushma Andhare
New Women Policy : साखर कारखान्यांत महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव ; मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब

सुषमा अंधारे यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी गृहमंत्र्यांकडे द्यावेत. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्याच दिवशी गृहमंत्र्यांना चौकशी करण्यासाठी पत्र दिले आहे. तसेच पत्र पोलिस आयुक्तांनाही दिलेले आहे, असेही देवयानी फरांदे यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की, मी गेल्या चार अधिवेशनांत ड्रग्जच्या विरोधात लढा देत आहे. नाशिक ड्रग्जमुक्त करण्यासाठी मी लढते आहे. माझ्याकडील ड्रग्ज माफियांची नावे, त्यांचे फोन नंबर पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच गृह विभागाच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर सोलापूरपासून नाशिकपर्यंतचे सर्व ड्रग्जचे कारखाने उघडकीस आले.

Devyani Pharande - Sushma Andhare
Bhaskar Jadhav News : भास्करराव बोलताना भावूक झाले अन्‌ विधानसभा ‘पिन ड्रॉप सायलेंट’ झाली...

ड्रग्जच्या विरोधात मी सातत्याने बोलते आहे. पण, तो ललित पाटील हा उबाठा शिवसेनेचा असल्यामुळे सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्यांच्या विरोधात मला हक्कभंग मांडायचा आहे, असे फरांदे बोलत होत्या. त्याच वेळी विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करत सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेच्या मुद्यावर तुम्हाला बोलता येणार नाही. तुम्ही माझ्याकडे तुमचा हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करा. मी तो प्रस्ताव तपासून योग्य तो निर्णय घेईन, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Devyani Pharande - Sushma Andhare
Narsayya Adam Dream Project : मोदींची सभा यशस्वी करण्यासाठी माकपचे आडम मास्तर लागले कामाला; माजी आमदारांची स्वप्नपूर्ती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com