ADCC Bank Bharati Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ADCC Bank Bharati : 696 जागांवर भरती, आरक्षण गायब; जितेंद्र आव्हाडांकडून प्रश्नांचा भडीमार

Pradeep Pendhare

Ahmednagar News : देशात आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर आरक्षण संपवणार, असा आरोप करतेय. यातच भाजपचे प्रभुत्व असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या 696 जागांवरील भरतीत आरक्षण ठेवलेलं नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टायमिंग साधत भाजपवर निशाणा साधला आहे. सहकार विभाग आणि राज्य सरकार काय करतंय? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत 696 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे 27 सप्टेंबर आहे. क्लार्क, वाहनचालक आणि सुरक्षारक्षक पदांसाठी भरती राबवली जात आहे. परंतु या पदभरतीसाठी आरक्षण ठेवलेलं नाही. त्यामुळे ही भरती वादात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भरती प्रक्रियेत आरक्षण ठेवलं नसल्याच्या मुद्यावरून प्रश्न उपस्थित केले आहे. तसं एक्स खात्यावर पोस्ट शेअर केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ADCC Bank मध्ये भरती प्रक्रिया होत असताना त्यात आरक्षण ठेवण्यात आलेले नाही. या ADCC Bank वर भाजप (BJP) पक्षाशी संबंधित असलेल्या मंत्र्यांचे प्रभुत्व आहे. एवढी मोठी प्रक्रिया राबवत असताना, त्यात आरक्षण नसणे हा गंभीर मुद्दा असून, सहकार विभाग आणि राज्य सरकार काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आरक्षण विरोधी भूमिका असेल, तर त्यांनी स्पष्ट करावं, जनता जनार्दन न्याय करेल, असेही जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ADCC Bank वर भाजप मंत्र्यांच वर्चस्व

ADCC Bank ने नोकर भरतीत आरक्षण ठेवले नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या बँकेवर भाजप पक्षाची संबंधित असलेल्या मंत्र्यांच प्रभुत्व आहे. त्यातच देशात सध्या आरक्षणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. दोन्ही बाजूकडून आरक्षण संपवण्याचा आरोप एकमेकांवर होत आहेत. यातच भाजपचे प्रभुत्व असलेल्या ADCC Bank च्या नोकर भरतीत आरक्षण ठेवले नसल्याने अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत.

आरक्षणावर संचालक मंडळ गप्प

ADCC Bank 2017 मध्ये नोकर भरती राबवली होती, त्यावेळी सामाजिक आणि समांतर आरक्षण ठेवलं होतं. आता मात्र आरक्षण ठेवलेलं नाही. आरक्षण का ठेवलं नाही, याबाबतची भूमिका ADCC Bank च्या संचालक मंडळाकडून अजूनही स्पष्ट करण्यात आलेली नाही. दरम्यान, ADCC Bank च्या संचालक मंडळाने भरतीची सर्व जबाबदारी अधिकार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांना दिलेत. सहकारमधील आरक्षण बंद झाले का? असा प्रश्न पडला असून, त्यावर कोणीही बोलायला तयार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT