Ajit Pawar Politics: राष्ट्रवादीच्या महिलांच्या सुचक घोषणा, 'लाडक्या बहिणी कुणाच्या, अजित दादाच्या'

Ajit Pawar Politics: NCP Ajit Pawar party women's awareness campaign-लाडकी बहीण योजनेसाठी अजित पवार गटाच्या महिलांनी केली नाशिक मध्ये मानवी साखळी
Ajit Pawar & Prerana Balkawde
Ajit Pawar & Prerana BalkawdeSarkarnama
Published on
Updated on

NCP Ajit Pawar News: महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रस्त्यावर उतरून जनजागृती करीत आहे. नाशिकमध्ये पक्षाच्या महिलांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.

महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत एक कोटीहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे. या महिलांना अनुदान देखील दिले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांतच त्याबाबत राजकीय स्पर्धा दिसून येते आहे.

या संदर्भात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजना यापुढेही सुरूच राहिल्या पाहिजेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मोहीम हाती घेतली आहे. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रेरणा बलकवडे यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन या विषयावर महिला आघाडी सह जनजागृती केली.

राज्य सरकारने महिलांसाठी विविध घटकांसाठी मोठ्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमुळे समाजामध्ये सरकार विषयी अनुकूलता आहे. या योजना यापुढे सुरू राहिल्या पाहिजेत. अशी लोकांची भावना आहे.

Ajit Pawar & Prerana Balkawde
Sharad Patil: धुळे शहरात यंदाच्या निवडणुकीत `एमआयएम`च्या मदतीला कोण?

त्या दृष्टीने पक्षाने जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसह शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवा, बेरोजगार अशा विविध घटकांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेमुळे समाजाच्या विकासाला चालना मिळेल, असे सौ बलकवडे यांनी सांगितले

आज यासंदर्भात शहरातील मुंबई नाका भागात पक्षाच्या कार्यालयासमोर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी केली. त्यात शेकडो महिला सहभागी झाल्या. या महिलांनी विविध घोषणा दिल्या. यामध्ये "लाडक्या बहिणी कुणाच्या, अजितदादांच्या" या घोषणा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.

महायुती सरकारमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट समाविष्ट आहे. मात्र लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारावर सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडी घेतली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जाण्याची संधी म्हणून या पक्षाच्या महिला आघाडीने उपक्रम हाती घेतले आहेत.

Ajit Pawar & Prerana Balkawde
Shivsena Politics: बडगुजर प्रकरणात अंबडचे पोलीसच अडकले संशयाच्या भोवऱ्यात?

जिल्ह्यात या योजनेच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबविण्यात आली. शासनाकडून लाडकी बहीण सह विविध योजना सुरू आहेत. त्याबाबत विरोधी पक्ष अपप्रचार करतात. त्यामुळे लाभार्थी महिला आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार घेत असलेले परिश्रम या मानवी साखळीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो. आगामी काळात महायुती सरकारला त्याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास सौ बलकवडे यांनी यावेळी व्यक्त केला.

महिला आघाडीच्या पदाधिकारी शितल भोर, भारती खिरारी, सरला गायकवाड, अपर्णा खोत, कल्पना बर्वे, अपेक्षा अहिरे, नलिनी वाजे, रूपाली पठाडे, वृषाली बच्छाव, रोहिणी रोकडे, मंगल मोकळ यांसह विविध पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com