Ashwinee Patil visited farms. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अवकाळीग्रस्तांसाठी आमदार कुणाल पाटील विधानसभेत अन् पत्नी थेट बांधावर!

पीक नुकसानीच्या पाहणीसाठी विविध गावांना भेटी देत शेतकऱ्यांना धीर दिला.

Sampat Devgire

धुळे : गेले दोन दिवस अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हा प्रश्न विधिमंडळातही (Assembly) उपस्थित झाला. आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी आपल्या मतदारसंघातील (Dhule) शेतकऱ्यांना भऱपाईसाठी विधीमंडळात आवाज उठवला. दुसरीकडे त्यांच्या पत्नी थेट बांधावर पोहोचल्या. त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिल्याने पाटील कुटुंबियांची सक्रीयता चर्चेत आहे.

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली, तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी अश्‍विनी पाटील धुळे तालुक्यातील विविध गावांत पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेतात पोचल्या. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्‍वासन देत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

धुळे तालुक्यासह जिल्ह्यात सोमवारी (ता. ७) अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीच्या अनुषंगाने आमदार पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात नुकसानीचे तातडीने पंचनामे करून विनाविलंब शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. एकीकडे आमदार पाटील शेतकऱ्यांचा प्रश्‍न विधिमंडळात मांडला, तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी श्रीमती पाटीलही मागे राहिल्या नाहीत. अंगावर वीज कोसळून मृत्यू झालेल्या बोरसुले (ता. धुळे) येथील शीतल राकेश गिरासे यांच्या परिवाराची त्यांनी भेट घेतली व परिवाराचे सांत्वन केले.

आमदारांना दिली माहिती

शिरधाणे प्र. नेर, गोंदूर, कावठी, खंडलाय आदी भागांमध्ये जाऊन त्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला, पपई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पाहणीप्रसंगी मंडलाधिकारी, तलाठी तसेच कृषी सहाय्यक आणि शेतकऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. या नुकसानीची माहिती आपण आमदार पाटील यांना दिल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील, मंडलाधिकारी समाधान पाटील, तलाठी स्वप्नील शिंदे, कृषी सहाय्यक बोरसे, पुष्पा भदाणे, राजेंद्र पाटील, हिरालाल पाटील, गोरख पाटील, निसार पठाण, सुरीतराम पाटील, कन्हय्यालाल भदाणे, गोरख भदाणे, ज्ञानेश्वर महाले व शेतकरी उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT