MLA Kunal Patil
MLA Kunal Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kunal Patil News; धुळ्याच्या प्रश्नांवर नागपूर अधिवेशनात घडवली चर्चा

Sampat Devgire

धुळे : (Dhule) नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे (Congress) आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी रस्ते, पूल, शेती, सिंचन, आदिवासी, (Trible issues) अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी प्रश्‍नांवर आवाज उठवत ते सोडविण्याची मागणी केली. तसेच नेर, भदाणे, महिंदळेजवळ पांझरा नदीवर, तर मांडळ, धामणगाव येथे बोरी नदीवर पुलाच्या बांधकामास मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. धुळ्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर यानिमित्ताने चर्चा घडली. (MLA Kunal Patil raise the public issues of Dhule)

अधिवेशनात आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. ती तत्काळ दिली जावी. पांझरा नदीवर महाल पांढरी, नेरजवळील नूर नगर येथे पुलाची आवश्यकता आहे. हा पूल तातडीने मंजूर करण्यात यावा.

मानधन वाढवा

अंगणावाडी कर्मचाऱ्यांना वेळेत मानधन देऊन तसेच वाढती महागाई लक्षात घेता त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी केली. आदिवासी विकास कार्यालयातील कामे निधीअभावी ठप्प झाली आहेत. ठक्कर बाप्पा योजनेला दोन वर्षापासून निधी देण्यात आला नसल्याने सरकारने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा.

हद्दीतील गावांचा प्रश्‍न

महापालिका हद्दवाढीत २०१८ ला धुळे तालुक्यातील अंशतः नगावसह वलवाडी, भोकर, महिंदळे, नकाणे, अवधान, चितोड, वरखेडी, बाळापूर, मोराणे प्र. ल., पिंप्रीचा समावेश झाला. मात्र, तेथे मूलभूत सुविधांसाठी पुरेसा निधी मिळालेला नाही. तरीही महापालिकेने वाढीव मालमत्ता कर आकारणी केली. ती रद्द करण्याची मागणी आहे. तसेच, या ११ गावांतील विकासासाठी शासनाकडे १२२ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यास मंजुरीतून चालना द्यावी. महाविकास आघाडी सरकारने वलवाडी येथे ओपन स्पेस, रस्ते डांबरीकरण, गटारींसाठी सात कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, विद्यमान सरकारने या कामांना स्थगिती दिली असून स्थगिती उठविण्याचीही मागणी केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT