Lahu Kanade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lahu Kanade : 'आज नावं ठेवणारे काँग्रेसने काढलेल्या शाळांमधूनच शिकलेत' ; आमदार कानडेंचा विरोधकांवर निशाणा!

Srirampur Congress News : प्रस्थापितांची गुलामगिरी सोडून युवकांनी काँग्रेसला साथ द्यावी, असं आवाहनही केलं आहे.

Pradeep Pendhare

Congress News : श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. 'प्रस्थापितांनी गरीब जनतेला लुळेपांगळे केले. लोकांना गुलाम बनवण्यासाठी सर्व सत्ता त्यांनाच पाहिजे. प्रस्थापितांची गुलामगिरी सोडून युवकांनी काँग्रेसला साथ द्यावी. काँग्रेसला आज नाव ठेवणारी काँग्रेसने काढलेल्या शाळांमधूनच शिकले आहेत.', अशी फटकेबाजी आमदार कानडे यांनी केली.

श्रीरामपूर शहर युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात आमदार लहू कानडे बोलत होते. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, कार्लस साठे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, कलीम कुरेशी, विधानसभा समन्वयक प्रवीण काळे राजेंद्र कोकणे व्यासपीठावर उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार कानडे म्हणाले, 'युवकांमध्ये देश घडविण्याची ताकद आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत तरुण मुले सर्वात पुढे होते. काँग्रेस पक्ष हा एक विचार आहे. युवकांनी काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी साक्षरतेचे प्रमाण 12 टक्के पेक्षा कमी होते. आता आता ते 70 टक्के पेक्षा अधिक आहे. त्याकाळी शेतकरी, कष्टकरी यांना अक्षराची ओळख नव्हती. अशा स्थितीत काँग्रेसने 60 ते 70 वर्ष देश चालविला. आज काँग्रेसला जे नाव ठेवतात ते काँग्रेस पक्षाने काढलेल्या शाळांमधून शिकले आहेत".

तसेच काँग्रेस पक्षाने सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत ठेवण्याचा, त्यांना जपण्याचा सातत्याने प्रयत्न केला. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहकार्याने देशाला लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय दिल्याचेही ते म्हणाले.

याशिवाय 'राजकारणात दोन गट असतात. एक प्रस्थापित व दुसरा विस्थापित. चाकरी आणि गुलामी करण्यासाठी प्रस्थापितांना तुम्ही हवे असतात. प्रस्थापितांनी गरीब जनतेला लुळेपांगळे केले आहे. लोकांना गुलाम करण्यासाठी सर्व सत्ता त्यांनाच पाहिजे आहे. आम्ही विचारवंत, अभ्यासक आहोत. समाजासाठी आम्हाला काहीतरी करायचे आहे. त्यामुळे प्रस्थापितांची गुलामगिरी सोडून युवकांनी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी.'

तसेच 'काँग्रेसचा विचार हा देशाला पुढे घेऊन जाणारा आहे. देशात युवकांची संख्या मोठी आहे. तरुणांमध्ये मोठी ताकद आहे. तरुणांनी काँग्रेसचा विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत, काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असेही आवाहन आमदार कानडे यांनी केले.

तर 'सचिन गुजर यांनी युवकांना काँग्रेस पक्षामध्ये संधी आहे. काँग्रेस पक्ष कोणा एकाचा नाही. आज सर्व क्षेत्रात युवकांसमोर आव्हाने आहेत. युवकांनी सर्व ताकदीने एकत्र येऊन पुढे यावे. गटातटाचा विचार न करता विकासाचे राजकारण करावे.' असे सांगितले.

ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी आमदार कानडे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देऊन युवकांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय नाईक, युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस तालुका सरचिटणीस मुदसर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीरामपूर विधानसभा शहर समन्वयक प्रविण काळे, शिर्डी लोकसभा युवक काँग्रेस समन्वयक अमोल आदिक तसेच शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मानस कोठारी, सरचिटणीस ओमकार कुटे उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT