Gram Panchayat Election Results : अटीतटीच्या लढतीत बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) पक्षाचे आमदार महेश शिंदे यांनी बाजी मारली आहे. कोरेगाव मतदार संघात राष्ट्रवादीचे (NCP) नेते शशिकांत शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.
मतदार संघात शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्यात नियमीत वर्चस्वाचा सामना असतो. त्यामध्ये शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी बाजी मारली आहे. कोरेगाव तालुक्यात ५१ पैकी ३४ जागांवर आमदार महेश शिदेंच्या गटाचा मोठा विजय झाला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
मात्र, शशिकांत शिंदे गटाचे फक्त १७ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे विधानसभेपासून सुरु झालेली शशिकांत शिंदे यांची पिछेहाट सुरुच आहे. त्या गोकुळच्या निवडणुकीतही धक्का बसला होता. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्यासाठी ग्रामपंचायतची निवडणूक महत्त्वाची होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान, कऱ्हाड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचीही पार पडली. त्यात किवळ, आटके, पाडळी-हेळगाव, तळबीड, सुपने, जुने कवठे, वडगाव हवेली, कोरेगाव, आणे या ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. या निवडणुकीत कऱ्हाड उत्तरमध्ये माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांची सत्ता कायम राहिली आहे. दक्षिमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपच्या अतुल भोसले यांच्या गटाला संमीश्र यश मिळाले आहे.
कऱ्हाड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसलीदार विजय पवार यांच्या उपस्थितीत आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. निवडणुक शाखेचे युवराज पाटील, विनायक पाटील व मंडल अधिकारी यांनी मतमोजणीसंदर्भातील सुचना दिल्या. कवठे ग्रामपंचायतीत 20 वर्षानंतर सत्तांतर घडवत काँग्रेसने बाजी मारली. आमदार पृथ्वीराज चव्हाण व उंडाळकर गटाच्या नेतृत्वाखालील श्री जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलनने सरपंचपदासह सात जागेवर विजय मिळवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.