MLA Mangesh Chavan
MLA Mangesh Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार चव्हाण यांच्या फेसबुकवर काळा बुरखाधारी सुरा घेतलेली व्यक्ती कोण?

Sampat Devgire

जळगाव : चाळीसगावचे (Jalgaon) भाजप (BJP) आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांचे फेसबुक अकाउंट (FB account) हॅक करत अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेले धमकी देणारे तसेच बदनामीकारक छायाचित्र अपलोड केले. एवढेच नव्हे, तर फेसबुक पेजला कार्यालयीन कामकाज बघणारे गोपाल म्हस्के यांचे लिंक असलेल्या क्रेडिटकार्डमधून ७० हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत (Cyber police) गुन्हा दाखल झाला आहे. (Cyber crime branch registered a FIR for FB account hacked by unknown person)

आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाउंट हॅक केल्याबाबत, गोपाल शिवाजी म्हस्के (रा. टाकळी प्र.चा., ता. चाळीसगाव) यांनी याबाबत जळगाव सायबर पोलिसांत फिर्याद दिली.

त्यानुसार २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंट “Mangesh Chavan” व “Mangesh Chavan-मंगेश चव्हाण” हे फेसबुक पेज हॅक केले. त्यानंतर प्रोफाइल छायाचित्र बदलून त्यावर काळा बुरखा (कपडा लपटलेला) चेहरा व हातात चाकू घेतलेल्या व्यक्तीचे धमकी देणारे तसेच बदनामीकारक छायाचित्र अपलोड केले.

फेसबुक अकाउंटवरील पोस्टदेखील डिलीट केल्या. एवढेच नव्हे, तर Mangesh Chavan-मंगेश चव्हाण या फेसबुक पेजला लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडिटकार्डमधून ओटीपी न घेता ७० हजार ८०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT