Mehboob Shaikh Latest News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP News : मेहबूब शेख यांच्यावर टीका करताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली

Shinde Faction MLA's Verbal Slip While Criticizing Mehboob Sheikh : महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

Sachin Waghmare

Jalgaon Political News: विधानसभा निवडणुका तोंडावर आली असल्याने सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करीत आहेत. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवस्वराज्य यात्रेत बोदवडमध्ये महेबूब शेख यांनी शनिवारी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी “रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करता तेव्हा तुम्हाला लाडकी बहीण आठवत नाही का? बहिणीचा सन्मान करू शकत नाही, अशा आमदाराचं करायचं काय? अशा आमदारांना धडा शिकवायला हवा,' अशा शब्दात टीका केली होती. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

मेहबूब शेख हा आमच्यावर काय बोलेल. मेहबूब हा ग्रामपंचायत नगरपालिका सदस्य निवडून आणू शकत नाही. आमच्या मतदारसंघात येऊन बोलतोय. सुपारीबाज आहे. चित्रा वाघ या महिला भगिनींवर टोकाच्या भाषेवर बोलतोय, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

“मेहबुब शेख हा सुपारी घेऊन बोलणारा माणूस आहे. आता औकात दाखवण्याची वेळ आली आहे. तेव्हा तुझी औकात दाखवू, तुझा जेवढा पगार आहे तेवढाच बोल, पगाराच्या बाहेर जाऊन बोलू नको. एका महिलेविषयी तू बोलतोस, त्यामुळे तुला योग्य वेळी योग्य जागा दाखवू”, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.

अमोल कोल्हेंवरही केली टीका

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी खासदार अमोल कोल्हेंवरही टीका केली आहे. अमोल कोल्हे यांचा कार्यक्रम पेड असतो. अमोल कोल्हे हा नाटकी माणूस आहे. अमोल कोल्हे आधी शिवसेनेत होते. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत (NCP) गेले. काय साक्षात्कार त्यांना झाला. लाखो रुपये घेतात तेव्हा ते शंभूराजेचा इतिहास सांगतात, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT