Sangram Jagtap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangram Jagtap : खबरदार! ...तर गाठ माझ्याशी आहे; संग्राम जगतापांनी विरोधकांना का दिला थेट इशारा?

Kedgaon Bhushannagar Development Works : संत गुरु रविदास महाराज यांच्या 647व्या जयंतीनिमित्त केडगाव भूषणनगर येथे सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन

Pradeep Pendhare

Nagar News : विकासकामांमध्ये अडचणी निर्माण करणाऱ्यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी इशारा दिला आहे. नागरिकांची विकासकामे थांबवून त्यांना त्रास देण्याचे आणि अडचणीत आणण्याचे काम केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशारा आमदार जगताप यांनी दिला आहे. संत गुरु रविदास महाराज यांच्या 647व्या जयंतीनिमित्त केडगाव भूषणनगर येथे सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी निलेश बांगरे, विजय घासे, अशोक कानडे, शिवाजीराव साळवे, संपत बारस्कर, सुनील कोतकर, प्रा. माणिक विधाते उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप यांनी विकासकामे रेंगाळण्यामागची कारणे सांगून नगरमधील विकासकामांमध्ये हा प्रकार यापुढे खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. "राजकीय चालीमुळे विकासकामे रेंगाळली जातात. समाजाच्या विकासकामात कोणीही राजकीय चाली करू नये. काम कुणी केले? हे सर्वसामान्यांना सगळे माहीत असते. श्रेय कोणी घेतले तरी चालेल. मात्र नागरिकांची विकासकामे थांबवून त्यांना त्रास देण्याचा व अडचणीत आणण्याचे काम कोणी करु नये", अशा शब्दात आमदार जगताप यांनी सुनावले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सभागृहासाठी आणि नगर शहराच्या विकासात्मक कामासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याने विकासकामे मार्गी लागली आहेत. सभागृहासाठी 50 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून, यापुढे देखील निधी मिळणार असल्याचे आश्‍वासन आमदार जगताप यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक कानडे यांनी चर्मकार समाजातील उपेक्षित घटकांचे अनेक प्रश्‍न आहे. समाज एकत्र आल्यास त्यांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने निलेश बांगरे यांनी आमदार जगताप यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला या सभागृहाच्या माध्यमातून यश आल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT