Police Constable Firing Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics: नाशिक मध्येही आमदाराच्या सुरक्षा रक्षकाने रोखली पिस्तूल!

MLA Suhash Kande; police bodyguard miss use service revolver in Nashik-आमदार सुहास कांदे यांचे सुरक्षा रक्षक राहिलेल्या पोलिसाने नाशिक रो़च्या हॉटेलच्या वेटरवर थेट सर्विस रिवाल्वर रोखली

Sampat Devgire

Police News: राज्यात विविध ठिकाणी पिस्तूल आणि गावठी कट्ट्यांचा दुरुपयोग सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारांकडून त्यांचा वापर होतो. काही ठिकाणी मात्र चक्क पोलिसांकडूनच त्याचा दुरुपयोग होऊ लागल्याने चर्चेचा विषय आहे.

राज्यात अनेकजिल्ह्यात राजकीय नेत्यांचा गुन्हेगारांशी संबंध आणि थेट सहभाग याविषयी नेत्यांकडूनच आरोप, प्रत्यारोप सुरू आहे. तो सध्या राज्यभर चर्चेचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारलाही प्रश्न केले जात आहेत. धनंजय मुंडे या मंत्र्यावर त्यांच्याा विरोधकांनी थेट आरोप केले जात असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. अशाातच हा प्रकार घडला आहे. त्याची जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गंभीर दखल घेतली.

ही सर्व प्रकरणे ताजी असतानाच नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार सुहास कांदे यांचे अंगरक्षक राहिलेले पोलीस विशाल झगडे यांनी थेट हॉटेलमध्ये वेटरवरच पिस्तूल रोखली. पोलीस कॉन्स्टेबल झगडे यांनी यापूर्वी अनेकदा अशीच दादागिरी आणि गैरप्रकार केले होते. संबंधित हॉटेलमध्येही त्यांनी त्याची पुनरावृत्ती केली.

पोलीस कॉन्स्टेबल झगडे यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची सर्विस रिवॉल्वर पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पोलीस झगडे हा आमदार सुहास कांदे यांचा अंगरक्षक राहिला असल्याने एकच खळबळ उडाली.

शुक्रवारी मध्यरात्री नाशिक रोड रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल रामकृष्ण येथे हा प्रकार घडला. मध्यरात्री बाराला पोलीस कॉन्स्टेबल झगडे हा जेवणासाठी येथे गेला होता. यावेळी त्याला रोटी हवी होती. त्यावरूनच वाद होऊन हा प्रकार घडला.

मध्यरात्र असल्याने रोटी उपलब्ध नसल्याचे वेटर सिराज शेख यांनी कॉन्स्टेबल झगडे याला सांगितले. त्याचा राग आल्याने पोलीस कॉन्स्टेबल झगडे यांनी थेट त्याच्यावर पिस्तूल रोखले. हॉटेलच्या मॅनेजर सागर पाटील यालाही धमकावले. मला आत्ताच्या आत्ता रोटी द्या अन्यथा, असे सांगत त्याने हवेत पिस्तूल फिरवत धमकावले, अशी तक्रार हॉटेलच्या संचालकांनी पोलिसांकडे केली.

याबाबत हॉटेलचे संचालक विनोद भगत यांनाही माहिती मिळाल्यावर त्यांनी चौकशी केली. यापूर्वीही पोलीस कॉन्स्टेबल झगडे यांनी अनेकदा अशीच दादागिरी व दमबाजी केल्याचे कळले. त्यासाठी ते आमदाराचा अंगरक्षक असल्याचे सांगत धमकावत होते. त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात जळगाव, पुणे, बीड यांसह विविध भागात राजकारणी आणि त्यांच्या सेवेत असलेले पोलिसांकडून पदाचा दुरुपयोग केल्याची प्रकरणे चर्चेत आहेत. याबाबक करूणा मुंडे आणि आमदार धस यांनी देखील आरोप केले होते. त्यावर माध्यमांत रोज चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत नाशिक रोड मध्ये पोलीस कॉन्स्टेबल झगडे यांनी सर्विस रिवाल्वरचा दुरुपयोग केल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT