MLA Vikram Pachpute meets FDA Commissioner Tukaram Mundhe to raise concerns over adulterated Bhandara being sold near Jejuri and other temples. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tukaram Mundhe : भेसळीची कारवाई सुरू असतानाच भाजप आमदाराने गाठलं तुकाराम मुंढेंचं ऑफीस; जेजुरीतील 'भंडारा' पुन्हा आला चर्चेत...

Tukaram mundhe and Vikram Pachpute : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरी गडासह इतर विविध प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त भंडाऱ्याची विक्री होत असल्याच्या गंभीर समस्येबाबत पाचपुते यांनी तुकाराम मुंढेंची भेट घेत त्यांना एक निवेदन दिलं आहे.

Jagdish Patil

Bhandara Adulteration : राज्यातील धडाकेबाज सनदी अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचा पदभार स्वीकारल्यापासूनच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचा चार्ज स्वीकारताच आयुक्त तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी राज्यभरात भेसळयुक्त पदार्थांच्या दुकानांवर कारवाई केल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

अशातच आता भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढेंची भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी भेट घेत मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरी गडासह इतर विविध प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त भंडाऱ्याची विक्री होत असल्याच्या गंभीर समस्येबाबत पाचपुते यांनी तुकाराम मुंढेंची भेट घेत त्यांना एक निवेदन दिलं आहे.

या निवेदनात त्यांनी 'भंडारा म्हणजे शुद्ध हळद' असल्याचं जाहीर करा, अशी मागणी केली आहे. सध्या अनेक व्यावसायिक देवस्थान परिसरात रासायनिक रंग आणि ज्वलनशील रसायने मिसळलेल्या भंडाऱ्याची सर्रास विक्री करत असल्याचं उघडकीस येत आहे. नुकतंच मागील काही दिवसांपूर्वी जेजरी गडावर उधळलेल्या भंडाऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली होती.

या घटनेचा दाखला देत आमदार पाचपुते यांनी भंडाऱ्यातील रासायनिक भेसळीकडे लक्ष वेधलं आहे. शिवाय हा भेसळयुक्त भंडारा शरीरात गेल्याने भाविकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाल्याचंही आमदार पाचपुते यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणलं आहे.

याबाबत आमदार पाचपुते यांनी तुकाराम मुंडेंना निवेदन दिलं आहे. या संदर्भात खुद्द पाचपुते यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "अनेक मंदिरांमध्ये हळदीचा भंडारा म्हणून वापर केला जातो. मात्र, आजकाल या भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. या भेसळीचा तोटा भाविकांना होत आहे.

पूर्वीपासून भंडारा म्हणून शुद्ध हळदच विकली जात होती आणि पुढेही हळदच भंडारा म्हणून विकली गेली पाहिजे. यासाठी 'भंडारा म्हणजे हळदच' हे कायद्यामध्ये नमूद करणे अत्यंत गरजेचे आहे," अशी मागणी तुकाराम मुंढेंकडे केल्याचं आमदार पाचपुते यांनी सांगितलं. तर पाचपुते यांच्या मागणीनंतर तुकाराम मुंढे यांनी येत्या काही दिवसांत आम्ही भंडारा म्हणजेच हळद हे लवकर कायद्यामध्ये अधोरेखित करू असं आश्वासन दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT