Nashik Kumbh allegations : नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा वेगळ्याच कारणाने विरोधकांच्या रडारवर आहे. यासंदर्भात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनीही हल्लाबोल केला आहे. त्यामुळे कुंभमेळ्याचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण एक महिन्यावर आले आहे. अशातच बहुतांशी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे विविध कारणांनी गाजत आहेत. यासंदर्भात विरोधकांनी मंत्री गिरीश महाजन यांना टार्गेट केले आहे.
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी कुंभमेळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याबाबत नाशिकला (Nashik) येऊन भांडाफोड करण्याचे जाहीर केले होते. आता मनसेही पुढे आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. याबाबत आपल्याकडे पुरावे आले आहेत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना त्याबाबत जाब विचारणार असल्याचे मनसे नेते अमित ठाकरे मंगळवारी म्हणाले.
कुंभमेळ्याच्या विकास कामांवर हजारो कोटी खर्च झाल्याचा दावा राज्य शासन करीत आहे. प्रत्यक्षात कामे कमी आणि त्याच्या गैर व्यवहार जास्त अशी स्थिती आहे. नाशिककरांना कुंभमेळ्याच्या सुविधा या ऐवजी असुविधा अधिक भोगावे लागत आहेत.
नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती तीव्र बनली आहे. पावसात मोठा खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरी अहवाल देईल झाला असून पिके नष्ट झाली आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने उपाययोजना आणि दिलासा देण्याची गरज आहे. मात्र सरकार कसली वाट पाहत आहे हेच समजत नाही.
जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने अनेक पिके वाया गेली आहे. सत्ताधारी मंत्री त्यावर काहीही बोलायला तयार नाही. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून थेट शेतकऱ्याच्या बांधावर जावे. त्यांना दिलासा द्यावा, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.