MNS leader Raj Thakre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मनसेच्या चेतन मैंदचा विजय म्हणजे राज ठाकरेंचा अमिताभ बच्चनचा डायलॅाग!

मनसेचे चेतन मैंद कळवण नगरपंचायत निवडणुकीत विजयी

Sampat Devgire

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) नगरपंचायतींच्या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू शकली नाही. मात्र जिल्ह्यात कळवणला (Nashik) त्यांचा एक उमेदवार विजयी झाला. हा उमेदवार व त्याचा विजय दोन्ही प्रत्येकाच्या ओठावर आहे. कारण या साधारण उमेदवाराने एका बलाढ्य नेत्याचा पराभव केला आहे. यातून राज ठाकरेंच्या (Raj Thakre) संवादाचे स्मरण झाले.

कळवण नगरपंचायतीत विजयी झालेल्या मनसेचा चेतन मैद हा एक साधारण कार्यकर्ता आहे. त्याला कोणतिही राजकीय पार्श्वभूमी नाही. मात्र त्याने राजकारणात दबदबा असलेल्या सुनिल महाजन या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचा पराभव केला तसेच नगरपंचायतीची सर्व राजकीय गणितेच बदलून टाकली. कारण महाजन हे नगाराध्यक्ष पदाचे दावेदार होते. मनसेप्रमुख राज ठाकरे एकदा अमर अकबर अँथनी चित्रपटातील अमिताभ यांच्या मारामारीत जखमी झाल्यानंतरचा संवाद म्हणाले होते, `एकही मारा, लेकीन सॅालीड मारा ना भाई` कळवणचा विजय त्या संवादाची आठवण करून देणारा आहे.

कळवण नगरपंचायतीत सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग आठमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेतन मैंद यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुनील महाजन यांचा धक्कादायक पराभव केला. महाजन हे याच प्रभागाच्या नगरसेविका अनिता महाजन यांचे पती, तर कमको बँकेचे अध्यक्ष, कृउबाचे संचालक, कळवण एज्युकेशन संस्थेचे विश्‍वस्त आहेत, तर चेतन मैंद या कुठलाही राजकीय पूर्वानुभव नसलेल्या नवख्या युवा उमेदवाराने महाजन यांचा केलेला पराभव कळवण शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

पती-पत्नी दुसऱ्यांदा विजयी

राष्ट्रवादीचे गटनेते व माजी उपनगराध्यक्ष कौतिक पगार आणि त्यांच्या पत्नी सुनीता पगार हे दांपत्य दुसऱ्यांदा विजयी झाले. कळवणच्या प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार या मागील वेळेस प्रभाग एकमधून बिनविरोध, तर यंदा प्रभाग सातमधून बिनविरोध निवडून आल्या. गटनेते कौतिक पगार हे मागील वेळेस प्रभाग सातमधून, तर यंदा प्रभाग एकमधून विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. यामुळे पगार दांपत्याची नगरपंचायतीत दुसऱ्यांदा दिमाखदार एन्ट्री झाली आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT