Monika Rajale 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Monika Rajale Won Election : भाजपच्या मोनिका राजळेंची विजयाची हॅटट्रिक; ढाकणे, घुलेंना पराभवाची धुळ चारली

Monika Rajale Won Shevgaon Pathardi Assembly Election 2024 final result : शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि हर्षदा काकडे यांच्यात चौरंगी लढत होती.

Pradeep Pendhare

Shevgaon Pathardi Assembly Election 2024 final result : भाजपच्या मोनिका राजळे पराभव होईल, असे वाटत असतानाच, मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात विजयमार्गावर मार्ग्रस्थ झाल्या. हा मार्ग त्यांचे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील रोखू शकले नाहीत.

भाजपच्या मोनिका राजळे यांना 98 हजार 630 मते घेत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांना 78 हजार 881 मते मिळाली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांना 57 हजार 235 मते मिळाली.

मतमोजणीत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील सुरवातीला आघाडीवर होते. परंतु शेवगावनंतर पाथर्डीतील मतपेट्यांची मोजणी सुरू झाल्यानंतर भाजप (BJP) मोनिका राजळे यांनी मतांची आघाडी घेतली. घुले मागे पडल्यानंतर राजळे आणि प्रतापराव ढाकणे यांच्यात लढत सुरू झाली. परंतु राजळे विजयाच्या मार्गावर पुढे निघून गेल्या.

एकतर्फी विजय वाटत असलेल्या भाजपकडून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या आमदार मोनिका राजळे यांना यावेळी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात चांगलेच आव्हान होते. 2014, 2019 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मोनिका राजळे करत आहेत. आता त्या हॅटट्रिकच्या तयारी आहेत. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जनशक्ती संघटनेच्या हर्षदा काकडे निवडणुकीच्या मैदानात होत्या. या चौरंगी लढतीवर मतदारसंघात पैजा लागल्या होत्या.

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या खंद्या समर्थक आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदा काकडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी कायम ठेवून आणि प्रचारात सातत्य राखल्याने चुरस निर्माण केली. हर्षदा काकडे यांच्या उमेदवारीमुळे मोनिका राजळे यांना धक्का बसू शकतो, असे सांगितले जात होते. एकेकाळी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हर्षदा काकडे यांना 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही. यावेळी देखील त्यांना डावल्यात आल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. हर्षदा काकडे आणि त्यांचे पती विद्याधर काकडे 40 वर्षांपासून या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे आमदार राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांना आव्हान उभं केले.

माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर काही काळ भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. शेवटी ते अजितदादा पवार यांच्याबरोबर गेले. महायुतीमुळे त्यांच्यासमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला. पण घुले पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यांनी निडवणुकीची तयारी लोकसभेपासून सुरू केली होती. मोनिका राजळे यांन ते तेव्हापासून वारंवार आव्हान देत होते.

ढाकणे कोठे कमी पडले?

भाजपच्या कुशीत तयार झालेले प्रतापराव ढाकणे पुढे शरद पवार यांच्याकडे आले. विधानसभेत एन्ट्री मिळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यावेळी त्यांनी मतदारसंघात बरीच ताकद उभी केली आहे. युवकांच्या संघटनवर भर दिला आहे. माजी मंत्री लोकनेते बबनराव ढाकणे यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूती होती. व्यापाऱ्यांशी अन् बाजारपेठेशी थेट संबंधामुळे यावेळी ते चमत्कार करतील, असे वाटत होते.

राजळेंची छुपी लाट

भाजप आमदार मोनिका राजळे यांना हॅटट्रिक करण्यासाठी त्यांनी देखील लोकसभा निवडणुकीपासून तयारी सुरू केली होती. भाजप लोकसभेचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी मोनिका राजळे यांनी देखील पायाची भिंगरी केली होती. त्यावेळी जनमताच्या रोषाला काही ठिकाणी त्यांना समोरे जावं लागलं. यातून त्यांनी विधानसभा निवडणूक सोपी नसेल, हे हेरून त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती. यात भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मोनिका राजळेंना आव्हान देण्यास सुरवात केली. यात पक्षातील प्रमुख पदाधिकारी असल्याने मोनिका राजळे यांची कोंडी झाली होती.

2024 मधील उमेदवार

मोनिका राजीव राजळे (BJP), सुभाष त्रिंबक साबळे (BSP), किसन जगन्नाथ चव्हाण (VBA), धीरज मोतीलाल बटाडे (RTORP), तुळशीराम नामदेव पाडळकर (ABPP), आत्माराम किसन कुंदकर (RSPS), प्रतापराव बबनराव ढाकणे (NCPSP), निलेश प्रमोद बोरुडे (अपक्ष), उद्धव तुकाराम माने (अपक्ष), अर्जुन कुंडलिक वारे (अपक्ष), अमोल सूर्यभान पेटारे (अपक्ष), बाळू बाबुराव कोळसे (अपक्ष), स्नेहल दत्तात्रय फंडे (अपक्ष), युनूस चंद शेख (अपक्ष), सुहास झुंबर चव्हाण (अपक्ष), एकनाथ विष्णू सुसे (अपक्ष), चोथे सुधाकर रामभाऊ चोथे (अपक्ष), चंद्रकांत भाऊसाहेब लबडे (अपक्ष), अंकुश भीमराव चितळे (अपक्ष), शिवहर पुंजाराम काळे (अपक्ष), गोकुळ विष्णू दौंड (अपक्ष), नवनाथ वामन कवडे (अपक्ष), हरिभाऊ दादा काळे (अपक्ष), सलमान ईसुब बेग (अपक्ष), यशवंत साहेबराव पाटेकर (अपक्ष), संदीप गोरक्षनाथ शेलार (अपक्ष), नामदेव मनोहर ठोंबरे (अपक्ष), रत्नाकर जनार्दन जावळे (अपक्ष), दिलीप कोंडीबा खेडकर (अपक्ष), चंद्रशेखर मारुतराव घुले पाटील (अपक्ष), हर्षदा विद्याधर काकडे (अपक्ष), किसन महादेव आव्हाड (अपक्ष), पांडुरंग गोरक्ष शिरसाट (अपक्ष), राजेंद्र रंगनाथ ढाकणे (अपक्ष).

2019 आणि 2014 मधील राजकीय स्थिती

शेवगाव-पाथर्डीमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजयाचा गुलाल उधळला होता. भाजपविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, अशी लढत झाली होती. भाजप उमेदवार मोनिका राजीव राजळे या 1 लाख 12 हजार 509 मतांनी विजयी झाल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांचा 14 हजार 294 मतांनी पराभव झाला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजय मिळवला होता. यावेळी भाजपविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, अशी लढत झाली होती. भाजप उमेदवार मोनिका राजळे या 1 लाख 34 हजार 685 मतांनी विजयी झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा 53 हजार 185 मतांनी पराभव झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT