Shivaji Kardile Won Election : शिवाजी कर्डिले पुन्हा 'किंग'मेकर ठरले; विजयाचा गुलाल उधळला

Shivaji Kardile Won Rahuri Assembly Election 2024 final result : राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात थेट लढत झाली.
Shivaji Kardile
Shivaji Kardile Sarkarnama
Published on
Updated on

Rahuri Assembly Election 2024 final result : राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी 2019 मधील पराभवाचा वचपा घेतला आहे.

कर्डिले यांनी विजयासाठी केलेले सूक्ष्म नियोजन, अन् शेवटच्या टप्प्यात केलेली व्यूहरचनेमुळे त्यांचा विजय सोपा झाला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला.

राहुरी मतदारसंघातील मतमोजणीने मतदारांची उत्सकता अधिकच ताणली होती. भाजपचे (BJP) शिवाजी कर्डिले कधी, तर प्राजक्त तनपुरे कधी पुढे असायचे. त्यामुळे निकालाची उत्कंठा वाढली होती. अटीतटीच्या लढतीत, शेवटच्या टप्प्यात शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला.

Shivaji Kardile
Vikram Pachapute Won Election : भाजपने ऐनवेळी उमेदवारी बदलली, पाचपुतेंनी विजयाचा 'विक्रम' घडवला

भाजप नेते राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या कुटुंबियांचे प्राबल्य असलेल्या राहुरी मतदारसंघात यंदा कोणचा विजय होता, याची उत्सुकता होती. विखेंची ताकद असलेल्या मतदारसंघात 2019 मध्ये शिवाजी कर्डिले यांचा सहज विजय होईल, असे वाटत असतानाच, त्यांना पराभवाला समोरे जावे लागले. यानंतर विखे आणि कर्डिले यांच्यातील राजकीय संबंधाचे पाणी पुलाखालून वाहून गेले. दोघांनी एकत्र येत जिल्हा सहकारी बँकेची सत्ता काबिज केली आणि कर्डिले यांना विखेंनी अध्यक्षपदी बसवलं. याच दरम्यान, राहुरीतील तनपुरे सहकारी कारखान्यावर प्रशासक आला. इथंच आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय संघर्षाला सुरवात झाली.

Shivaji Kardile
Radhakrishna Vikhe Won Election : राधाकृष्ण विखेंचा दणदणीत विजय; म्हणाले, 'विजय जनतेला समर्पित'

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आमदार तनपुरे यांना शरद पवार यांनी मंत्रिपदाची संधी दिली. अडीच वर्षात तनपुरे यांनी मंत्रिपदाच्या जोरावर मतदारसंघात सूक्ष्म नियोजन करत जनसंपर्क वाढवला. त्याचा फायदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तनपुरेंना झाला. याचवेळी तनपुरे यांच्याभोवती 'ईडी'चा ससेमिरा लागला. अडीच वर्षाच्या सत्तेनंतर महाविकास आघाडीचे सरकार गेले. याचबरोबर आमदार तनपुरे यांचा संघर्ष वाढला.

शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या सत्तेच्या माध्यमातून राहुरी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची पेरणी करायला सुरवात केली. सूक्ष्म नियोजनावर थेट जनसंपर्कावर भर दिला. आमदार तनपुरे यांच्या जवळचे माणसं हेरत अनेकांना निवडणुकीच्या तोंडावर फोडलं गेले. त्यामुळे आमदार तनपुरेंची कोंडी करण्यात कर्डिलेंना यश आले. यामुळे यंदाची निवडणूक राहुरी मतदारसंघात चुरशीची झाली. आमदार तनपुरे यांच्याविरोधात कर्डिले थेट अशी दुरंगी लढत झाली.

दरम्यान, भाजपकडून शिवाजी कर्डिले यांना उमेदवार जाहीर होताच, भाजप आणि संघ परिवाराशी एकनिष्ठ असलेले माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी थेट नाराजी व्यक्त केली. त्यांचे पुत्र सत्यजित कदम यांनी मतदारसंघावर दावा केला होता. यामुळे कर्डिलेंच्या अडचणी वाढू शकतात, असे वाटत असतानाच, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार कदम पिता-पुत्रांनी बंडाची तलवार म्यान केली.

2024 मधील उमेदवार

शिवाजी कर्डिले (BJP), रुपाली संदेश भाकरे (BSP), अनिल भिकाजी जाधव (VBA), इम्रान नबी देशमुख (BMUP), सिकंदर बबन इनामदार (ASPKR), प्रदिप प्रभाकर मकासरे (RPI(A)), शिवाजी गोविंद खेडेकर (RSPS) सोहम बापूसाहेब चिंधे (LSP), ज्ञानेश्वर दत्तात्रय गाडे (MNS), साहेबराव पाटीलबा म्हसे (MSP), प्राजक्त प्रसादराव तनपुरे (NCPSP), जयेश साहेबराव माळी (YY), मोहम्मद शोएब सुभेदार शेख (अपक्ष), प्रतिमा किशोर देसरडा (अपक्ष), अरुण भागचंद तनपुरे (अपक्ष), डॉ. जालिंदर घिगे (अपक्ष), अल्ताफ इब्राहिम शेख (अपक्ष), दिपक विठ्ठल बर्डे (अपक्ष), चोरमाले संदीप सोपान (अपक्ष), सविता ज्ञानेश्वर मेहेत्रे (अपक्ष), विजय दत्तू साळवे (अपक्ष), संतोष एकनाथ चोळके (अपक्ष),अक्षय रावसाहेब तनपुरे (अपक्ष), ज्ञानेश्वर बापूसाहेब मेहेत्रे (अपक्ष) नानासाहेब पंढरीनाथ झुंधारे (अपक्ष), सूर्यभान दत्तात्रय लांबे (अपक्ष).

2019 आणि 2014 मधील राजकीय स्थिती

राहुरी विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांनी 1 लाख 9 हजार 234 मतांसह विजय मिळवला. दुसऱ्या स्थानी भाजपचे शिवाजी कर्डिले होते. प्राजक्त तनपुरे यांनी त्यांना 23 हजार 326 मतांच्या फरकाने हरवले होते. या निवडणुकीत 68.76% मतदान झाले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी 91 हजार 454 मतांसह विजय मिळवला. दुसऱ्या स्थानी डॉ. उषा प्रसाद तनपुरे होत्या. त्यांचे विजयाचे अंतर 25 हजार 676 मतांचे होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शिवाजी कर्डिले यांनी 57 हजार 380 मतांसह 33.55% मत प्राप्त केले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद तनपुरे यांना हरवले होते. त्यांना 49 हजार 47 मतांसह 28.68% मत मिळाले होते. तसे पाहिल्यास 1980 ते 1999 दरम्यान, प्रसाद तनपुरे या क्षेत्रातून पाच वेळा निवडून जिंकले आहेत. त्यामध्ये चार वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आणि एक वेळा स्वतंत्र उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com