नाशिक : (Nashik) भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते. पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackrey) शिवसेनेचे (Shivsena) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली. (Shivsena leader Arvind Sawant said BJP is confusing people & there workers)
छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अवमान त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केला आता ते दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधत आहेत. त्यांच्या बाबतीत ‘औरंगजेबजी मै आया हूँ’ असे बोलावे लागेल, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
खासदार अरविंद सावंत नाशिकमध्ये खासगी कामासाठी आले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा केलेला अपमान त्यांना लक्षात राहत नाही. त्यामुळे भाजपचे नेते कायम दुसऱ्याचे कुसळ शोधत राहतात. परंतु त्यांची हीच भूमिका त्यांच्यावर बुमरँग होते. संभाजीनगरला जाऊन त्यांना ‘औरंगजेबजी मै आया हूँ’ असं काहीतरी त्यांना बोलावं लागेल, असा टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, ही ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ आहे. त्यात भाजपच्या नेत्यांचा समावेश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सत्त्व आणि तत्त्व न सोडण्याची शिकवण दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात सभा घेतली. आता नाशिकलादेखील त्यांची सभा होणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्र ते पिंजून काढतील. उद्धव ठाकरेंना फुटीरवादी लोकांनी जी वागणूक दिली. त्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याला उत्तर देताना जोगेंद्र हे इंद्र आहे की नाही, आधी ते ठरवा मग बघू, असे उत्तर खासदार सावंत यांनी दिले.
आचारसंहितेत विश्रामगृहाचा हट्ट
नाशिक विभागामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. यापूर्वी मंत्री असलेले खासदार अरविंद सावंत यांना प्रोटोकॉल संदर्भात काही गोष्टी अवगत असणे आवश्यक आहे. मात्र, आचारसंहिता लागू असतानाही त्यांनी शासकीय विश्रामगृहावर कक्ष हवा, अशी आग्रही मागणी केली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला तेथील कर्मचाऱ्यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील आचारसंहिता असल्याने कक्ष देता येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर सावंत यांना खासगी हॉटेलमध्ये राहणे क्रमप्राप्त ठरले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.