Maharashtra Politics : जेन-झीच्या आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यामुळे 12 वर्षांत पहिल्यांदा भाजप बॅकफूटवर गेली असतानाच सत्ताधारी भाजपच्या खासदार कंगना रणौत हिने जेन-झींवर आगपाखड केली. कंगना रणौतने पोस्ट करत जेन-झींना गटारछाप असे संबोधले.
ज्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले असून, याला CJPचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. एकीकडे कंगना रणौत आणि CJP यांच्यात शाब्दिक वाद रंगला असतानाच, भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी देखील आता फटकारले आहे. त्यांनी कंगना रणौतला मोलाचा सल्ला देत, बोलताना थोडं सांभाळून बोला, असे म्हटले आहे.
दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या कळकांड्या फोडल्यानंतर CJPसह विरोधी पक्षांनी सरकार आणि दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार मोर्चा उघडला. ज्यानंतर केंद्र सरकारला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. आता भाजपकडून CJPसह विरोधी पक्षांवर आगपाखड केली जात आहे. आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच, भाजप खासदार कंगना रणौत सीजेपी आंदोलनावर बरळली. जेन-झींवर आगपाखड करत सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये जेन-झींना लक्ष्य करत थेट गटारछाप म्हटलं.
या वक्तव्यानंतर आता गल्ली ते दिल्ली कंगना रणौतविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तर, या वक्तव्यामुळे भाजपवर देखील जोरदार टीका केली जात आहे. यावरून भाजप नेत्यानेच थेट सल्ला दिला आहे. जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी यावरून कंगना रणौतला सांभाळून बोलण्याचा सल्ला देत, बोलताना थोडा विचार केला पाहिजे, असे म्हटलं आहे.
कंगनाच्या विधानावर, "अशी वक्तव्यं कोणीही करू नयेत. आपण बोलताना थोडा विचार केला पाहिजे. हा विषय अत्यंत गंभीर असून, मोदींनी स्वतः या विषयात लक्ष घातलं आहे. परीक्षा पद्धतीमध्ये बदल केले जात आहेत. असं असताना आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी थोडं मापून बोलावं," अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.
तसेच, अभिजीत दीपके यांनी दिलेल्या इशाऱ्यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हे आंदोलन खरेच विद्यार्थ्यांचे होते. पण या आंदोलनातून राजकीय फायदा कसा उचलता येईल, या हेतूने काही राजकीय पक्षांची लोकं, गुंड या आंदोलनात मस्ती करत होते. पोलिसांनीदेखील या आंदोलनाशी संबंध नसलेल्या लोकांना पकडले असून, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच, ज्यांनी आंदोलनामध्ये फक्त दंगामस्ती केली, दगडफेक केली, पोलिसांवर हल्ला केला, वाहनांची तोडफोड केली, अशांना सोडण्याची गरज नाही, असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.