Girish Mahajan : वैर विसरून खडसेंनी वाढदिवसाचं निमंत्रण दिलं; पण महाजनांना नेमकं त्याच दिवशी महत्त्वाचं काम निघालं...

Eknath Khadse, Girish Mahajan : खडसे-महाजन यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. परंतु ते विसरुन एकनाथ खडसे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण महाजनांना दिलं आहे.
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांचे येत्या २ सप्टेंबरला अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्त ३० ऑगस्टला त्यांचा भव्य अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा होणार आहे. खडसेंची भाजपमधील घरवापसी व या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील मंत्री, केंद्रीय व राज्यातील वरिष्ठ नेते या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. राजकीय वैर विसरुन खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांना देखील या सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. खडसेंच्या अमृतमहोत्सवी सोहळा समितीतर्फे प्रा. सुनील नेवे, खडसेंचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते, विलास धायडे व राजू माळी आदींनी जामनेरला महाजनांच्या निवास्थानी जाऊन त्यांना या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण दिले.

आपल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही, नक्की कार्यक्रमाला या असे हात जोडून आग्रहाचे निमंत्रण महाजनांना देण्यात आलं आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता, मंत्री गिरीश महाजन यांनी त्यासंदर्भात आपली भूमिका मांडली.

Girish Mahajan & Eknath Khadse
Eknath Khadse : महाजनांच्या घराची बेल वाजली... अखेर एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाचं निमंत्रण पोहचलं ; 'कार्यक्रमाला या' म्हणत हात जोडून आग्रह

खडसे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर आहे. त्यामुळे मला जाता येणार नाही. असं महाजनांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. दरम्यान महाजनांचे हे उत्तर ऐकुन उपस्थित पत्रकार हसले आणि त्यानंतर गिरीश महाजनही मिश्किलपणे हसल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान मंत्री महाजनांनी एकनाथ खडसेंना शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी शंभर वर्षे पूर्ण करावीत. आणखी चांगले काम त्यांच्या हस्ते व्हावे, अशा शुभेच्छा महाजनांनी दिल्या आहेत. दरम्यान, मंत्री महाजन यांना नक्की त्या दिवशी काही महत्वाचे काम आहे की, महाजन जाणे टाळत आहेत याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Girish Mahajan & Eknath Khadse
Devendra Fadnavis : खडसेंच्या बागेतील खजूर फडणवीसांना गोड, दरवर्षीची परंपरा यंदाही ठेवली कायम, काय आहे विषय?

गुलाबरावांनाही निमंत्रण

महाजनांची भेट घेतल्यानंतर सोहळा समितीचे सदस्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही भेटले. पालकमत्र्यांनी निमंत्रण स्वीकारत या कार्यक्रमास आवर्जून येण्याची ग्वाही दिली. जिल्ह्यातील अन्य सर्व आमदार, खासदार स्मिता वाघ यांनाही प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात येणार असल्याचे प्रा. नेवे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com